Home /News /entertainment /

दीपिकाच्या फोटोवर प्रियांकानं उधळली स्तुतीसुमनं; म्हणाली, ‘असा फोटो...’

दीपिकाच्या फोटोवर प्रियांकानं उधळली स्तुतीसुमनं; म्हणाली, ‘असा फोटो...’

दीपिकाची 'बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani)' चित्रपटातील को-स्टार प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) दीपिकाच्या या फोटोवर कमेंट केली आहे.

    मुंबई 12 एप्रिल: बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पदुकोण (Deepika Padukone)सोशल मीडिया वर अॅक्टिव्ह असते. नुकतंच तिने इंस्टाग्रामवर तिचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला होता. दीपिकाच्या या फोटोवर बॉलिवूड कलाकारांसह चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. दीपिकाच्या (Deepika Padukone Childhood Photo) या फोटोवर कमेंट करून यूजर्स तिच्या क्यूटनेसचं कौतुक करत आहेत. तर अनेक बॉलिवूड स्टार्सनेही तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. यातच दीपिकाची 'बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani)' चित्रपटातील को-स्टार प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) दीपिकाच्या या फोटोवर कमेंट केली आहे. प्रियांका चोप्रानं दीपिकाच्या या चाइल्डहुड फोटोवर कमेंट करून तिला क्यूट म्हटलंय. दीपिकानं हा फोटो शेअर करताना मजेशीर कॅप्शन दिलंय. कॅप्शनमध्ये ती म्हणाली -'इंदिरानगरकी गुंडी हूं मैं.' हा फोटो तिच्या आईने काढला असल्याचंही तिनं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. दीपिकाच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना प्रियांकानं लिहिलंय -'Too Cute' यासोबतच तिनं हार्ट आय इमोजी देखील शेअर केलाय. प्रियांकाच्या कमेंटवर दीपिकानेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने हार्ट इमोजी पोस्ट करून प्रियांकाला थँक्यू म्हटलं आहे. अवश्य पाहा - ‘अंतर्वस्त्र परिधान केली की नाही?’; हटके स्टाईलमुळं प्रियांका चोप्रा होतेय ट्रोल दीपिकाच्या या फोटोवर तिचा पती आणि बॉलिवूड अॅक्टर रणवीर सिंहने देखील कमेंट केली आहे. रणवीरने दीपिकाच्या फोटोवर लाफिंग आणि लव्ह इमोजी टाकले आहेत.रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा और दीपिका पदुकोण या तिघांनी संजय लीला भंसाळींच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात सोबत काम केलं होतं. या चित्रपटात रणवीर सिंहने मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव, प्रियांका चोप्राने त्यांची पत्नी काशीबाई आणि दीपिका पादुकोणनं बुंदेलखंडची राजकुमारी मस्तानीची भूमिका साकारली होती. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास दीपिका पादुकोणफिल्म83मध्ये दिसणार आहे.'83'मध्ये दीपिका पती रणवीर सिंह सोबत स्क्रीनशेअर करताना दिसून येईल. यासह दीपिका शकुन बत्रासोबत एक चित्रपट करतीए,याचित्रपटात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी तिचे को-स्टार आहेत. तसेचसाऊथचा सुपरस्टार प्रभाससोबत(Prabhas)एका चित्रपटात दीपिका झळकणार आहे. याचित्रपटात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)महत्त्वाची भुमिकासाकारतील. दीपिका हृतिक रोशनसोबत'फायटर'चित्रपटात काम करणार असून बिग बींसोबत'द इंटर्न'चित्रपटातदेखील काम करणार आहे.
    First published:

    Tags: Deepika padukone, Priyanka chopra

    पुढील बातम्या