मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत तब्बल 50 हजारांहून अधिक लोकांनी नाकारला लसीकरणाचा दुसरा डोस

मुंबईत तब्बल 50 हजारांहून अधिक लोकांनी नाकारला लसीकरणाचा दुसरा डोस

Covid-19 Vaccine: मुंबईत वेगानं लसीकरण सुरु आहे. प्रत्येक मुंबईकरांनी लस घ्यावी यासाठी प्रशासन विविध योजना ही आखत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 10 जून: मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच मुंबईतील कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याचं चित्र दिसून येतं आहे. मुंबई पालिकेकडून (The Brihanmumbai Municipal Corporation ) लसीकरणावरही भर दिला जात आहे. मुंबईत वेगानं लसीकरण सुरु आहे. प्रत्येक मुंबईकरांनी लस घ्यावी यासाठी प्रशासन विविध योजना ही आखत आहे. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 50 हजार मुंबईकरांनी लशीचा दुसरा डोस घेतला नसल्याचं समोर आलं आहे. यासाठी पालिकेनं (BMC)आता अशा व्यक्तीचं ट्रेसिंग (Drive To Trace) सुरु केलं आहे.

मुंबईत काही लोकांनी पहिला डोस घेतला. त्यानंतर वेळ निघून गेल्यानंतरही लसीचा दुसरा डोस घेतला नाही आहे. मुंबईत अशा लोकांचा आकडा 50 हजारांहून अधिक आहे. त्यामुळे पालिकेनं आता अशा लोकांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC Launches Track Covid Vaccine Dropouts)

हेही वाचा- मुंबईत NCBची मोठी कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

पालिकेनं या लोकांचा शोध घेण्यास सुरु केलं असून प्रभाग कार्यालयांना याची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बीएमसीनं आता दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना वॉक-इन लसीकरणाची परवानगी देखील दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत 93.5 लोकसंख्या आहे. त्यापैकी केवळ 8 टक्के लोकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेत. तर 31 टक्के लोकांनी लसीकरणाचा केवळ एकच डोस घेतला आहे.

First published:

Tags: BMC, Corona vaccination, Coronavirus, Mumbai muncipal corporation