मुंबईत NCBची मोठी कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मुंबईत NCBची मोठी कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

NCB seized Cannabis: मुंबईत एनसीबीनं (NCB Mumbai) मोठी कारवाई केली आहे. तब्बल दीड कोटी रुपयांचं ड्रग्ज एनसीबीनं जप्त केलेत.

  • Share this:

मुंबई, 10 जून: मुंबईत एनसीबीनं (NCB Mumbai) मोठी कारवाई केली आहे. तब्बल दीड कोटी रुपयांचं ड्रग्ज एनसीबीनं जप्त केलेत. अमेरिकेतून भारतात आणलेले ड्रग्ज एनसीबीनं जप्त केल्याचं समजतंय. तसंच ड्रग्जच्या पार्सलवर इमर्जन्सी फूड असा उल्लेख करण्यात आला होता, अशी माहिती समोर येतेय. गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी मुंबईतील ड्रग्ज सप्लायर्स (Drug Suppliers)आणि पेडलर्सविरुद्ध (Peddlers)कारवाई करताना दिसत आहे. एनसीबीनं अनेक ठिकाणी छापेमारी करुनही बऱ्याचदा ड्रग्ज जप्त केलेत.

आज एनसीबीनं मुंबईतून 2.2 किलोचे ड्रग्ज जप्त केलेत. या एकूण ड्रग्जची किंमत जवळपास दीड कोटींच्या आसपास आहे. मुंबईत एनसीबीनं छापा टाकत ही कारवाई केली आहे. निळ्या रंगाच्या बॉक्सवर “Mountain House 05 day emergency food supply.(इमर्जन्सी फूड)'' असं लिहण्यात आलं होतं. सिल्व्हर रंगाच्या फूड पॅकेट्समध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते.

हेही वाचा- मालाड इमारत दुर्घटना: मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

Published by: Pooja Vichare
First published: June 10, 2021, 3:05 PM IST
Tags: NCB

ताज्या बातम्या