Home /News /mumbai /

मुंबईला Pfizer, मॉडर्ना, स्पुटनिक लसींचा पुरवठा करण्यास 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण...

मुंबईला Pfizer, मॉडर्ना, स्पुटनिक लसींचा पुरवठा करण्यास 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण...

Covid Vaccine for Mumbai: मुंबई महानगरपालिकेने कोविड प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यासाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला विविध कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई, 26 मे: लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने (BMC) ग्लोबल टेंडर काढत लस आयात (Global tender for covid vaccine) करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून मुंबईकरांना लवकरात लवकर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल. बीएमसीने काढलेल्या या ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला असल्याचं मुंबई मनपाने सांगितलं आहे. मात्र, असे असले तरी बीएमसीने या टेंडर प्रक्रियेला 1 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...म्हणून टेंडरला मुदतवाढ मुंबई मनपाने सांगितले की, लस पुरवठा करण्याच्या संदर्भात मुंबई मनपाने काढलेल्या ग्लोबल टेंडरला आणखी 3 संभाव्य पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे एकूण संभाव्य पुरवठादारांची संख्या 8 वर पोहोचली आहे. नव्याने आलेल्या पुरवठादारांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे त्यामुळे या टेंडर प्रक्रियेला 1 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या 8 कंपन्यांपैकी सात पुरवठादारांनी स्पुटनिक V (Sputnik V) तर एका पुरवठादार कंपनीने स्पुटनिक लाईट या कोविड लसीचा पुरवठा करण्यास तयारी दर्शवली आहे. तर आणखी एका कंपनीने अ‍ॅस्ट्रेझेनेका (AstraZeneca) फायझर (Pfizer) या लसीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई मनपाकडून 12 मे 2021 रोजी ग्लोबल टेंडर काढण्यात आलं होतं. त्यानंतर 18 मे पर्यंत 5 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता आणखी तीन कंपन्यांकडून लस पुरवठा करण्याच्या संदर्भात प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात फायझर कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही केवळ केंद्र सरकारलाच लस पुरवठा करू शकतो इतरांना लस पुरवठा किंवा आयात करण्यास अद्याप अधिकृत परवानगी नाहीये. आमचे भारत सरकारसोबत बोलणी सुरू आहे आणि राष्ट्रीय वापरासाठी लस उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने आम्ही चर्चा करत आहोत. ...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध आतापर्यंत प्रतिसाद प्राप्त झालेल्या कंपन्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांना मुदतवाढ देणे आवश्यक होते. 25 मे 2021 रोजी आणखी तीन पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यांच्यादेखील काही कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक आहे. या कंपन्यांकडून नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल? किती संख्येने लससाठा पुरवला जाईल? लसीचे दर अधिदान करण्याच्या संदर्भातील अटी आणि शर्थी या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन मनपा लस साठा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरवठा करत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या