मुंबई, 2 जून: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) या नेहमीच रोखठोक उत्तर देत असल्याचं पहायला मिळतं. मात्र, आता महापौर किशोरी पेडणेकर यांचा तोल गेला आणि त्यांनी एका नेटकऱ्याला असं काही उत्तर दिलं की ज्यामुळे त्या चांगल्याच ट्रोल (Kishori Pednekar trolled) होऊ लागल्या. ट्विटरवर एका युजरला महापौर किशोरी पेडणेकर यांनी जो शब्द वापरला आहे त्यावरुन त्या ट्रोल होत आहेत. ट्रोल झाल्यानंतर महापौरांनी सोशल मीडियावरुन ते ट्वीट डिलीट केलं. मात्र या ट्वीटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
झालं असं की, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली होती. ही मुलाखत मुंबईतील 1 कोटी लसीकरणाच्या संदर्भातील होती. ज्यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ग्लोबल कंत्राटाला 9 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख केला होता.
The lady in below tweet is Mumbai Mayor @KishoriPednekar
When asked who got the Vaccination Contract in @mybmc She answers "तुम्हारे बाप को " This is an insult to all #Mumbaikars waiting for Vaccination #ShivSenaInsultsMumbaikars pic.twitter.com/nif3GztZi7 — Devang Dave (@DevangVDave) June 2, 2021
मुंबईकरांनो कोरोना लस घेण्यापूर्वी वाचा ही बातमी; BMC ने दिली महत्त्वाची अपडेट
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की, कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचं कंत्राट दिलं आहे. यावर संतापलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला मराठीत उत्तर देत लिहिलं, "तुझ्या बापाला".
महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांची चांगलीच फजिती झाली. अखेर त्यांनी आपलं हे ट्विट डीलिट केलं. मात्र, असे असले तरी त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. तसेच महापौरांना चांगलेच ट्रोलही केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Corona vaccine, Kishori pedanekar