मराठी बातम्या /बातम्या /देश /मोबाईल खरेदीसाठी हवे होते 20 हजार, आईनं नकार देताच मुलानं उचललं टोकाचं पाऊल

मोबाईल खरेदीसाठी हवे होते 20 हजार, आईनं नकार देताच मुलानं उचललं टोकाचं पाऊल

आजकाल पालक आपल्या मुलांना प्रेमानं खेळण्यासाठी मोबाईल देतात.  पण हा मोबाईल (mobiles) त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी येणाऱ्या काळात खूप जीवघेणा ठरू शकतो.

आजकाल पालक आपल्या मुलांना प्रेमानं खेळण्यासाठी मोबाईल देतात. पण हा मोबाईल (mobiles) त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी येणाऱ्या काळात खूप जीवघेणा ठरू शकतो.

आजकाल पालक आपल्या मुलांना प्रेमानं खेळण्यासाठी मोबाईल देतात. पण हा मोबाईल (mobiles) त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी येणाऱ्या काळात खूप जीवघेणा ठरू शकतो.

राजस्थान, 14 जानेवारी: आजकाल पालक आपल्या मुलांना प्रेमानं खेळण्यासाठी मोबाईल देतात. पण हा मोबाईल (mobiles) त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी येणाऱ्या काळात खूप जीवघेणा ठरू शकतो. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात असंच एक प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण धौलपूर (Dhaulpur district) जिल्ह्यातील सरमाथुरा पोलीस स्टेशन परिसरातील बिजौली गावाशी संबंधित आहे. जिथे गुरुवारी रात्री एका तरुणानं पिस्तूलनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मृत तरुण आपल्या आईकडून 20 हजारांचा मोबाईल घेण्यासाठी हट्ट करत होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांचा 18 वर्षीय मुलगा संग्राम सिंह यानं बुधवारी दुपारी 20 हजार किंमतीचा मोबाईल घेण्यासाठी आईकडे हट्ट केला, मात्र पैसे नसल्यानं आईला मुलाचा हट्ट पूर्ण करता आला नाही. आईनं मुलाला वडिलांकडून पैसे घेऊन देण्याचं आश्वासन दिलं. यावर तरुणाने संतापून आपले पुस्तक आणि घरातील काही साहित्य पेटवून दिलं. मुलाचा राग पाहून आईनं आपल्याजवळचे 8 हजार रुपये मुलाला दिले. मात्र तरुण 20 हजार रुपये घेण्याच्या हट्टावर ठाम होता.

तरुणान केली आत्महत्या

तरुणाने संध्याकाळी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत तरुणाला सरमथुरा रुग्णालयात नेले. जिथे रुग्णालयात डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. या तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केली, त्यावेळी त्याचे वडील कामासाठी जयपूरला गेले होते. मृत तरुणाला दोन भाऊ आणि एक बहीण असून ते गावातील शाळेतच शिकतात.

हेही वाचा-  UN चा भारताला इशारा, करुन दिली Coronaच्या दुसऱ्या लाटेची आठवण

या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांना न कळवता कुटुंबीयांनी तरुणावर गावातील मुक्तीधाम येथे अंत्यसंस्कार केले. घटनेनंतर आईसह कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकृती वाईट आहे.

First published:

Tags: Rajasthan