धक्कादायक! 48 तासांत काळे पडले, 42 दिवसांत Black fungus मुळे चिमुकल्यांनी गमावले डोळे

राज्यात लहान मुलांना ब्लॅक फंगस होत (Black fungus in children) असल्याचं आढळून आलं आहे.

राज्यात लहान मुलांना ब्लॅक फंगस होत (Black fungus in children) असल्याचं आढळून आलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून : कोरोनाच्या (Corona wave) पहिल्या लाटेपासून लहान मुलं सुरक्षित राहिली. दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं. तिसऱ्या लाटेचा लहान (Corona third wave) मुलांना तसा कमी धोका आहे, असं सांगितलं जातं आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित झालेल्या लहान मुलांची अवस्था मात्र आता भयंकर होताना दिसते आहे. राज्यात लहान मुलांना ब्लॅक फंगस होत (Black fungus in children) असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईतच तीन लहान मुलांचे ब्लॅक फंगसमुळे डोळे काढावे लागले (Children eyes removed) आहेत. राज्यात 4 ते 16 वयोगटातील मुलांमध्ये ब्लॅक फंगसची समस्या दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये ब्लॅक फंगसची वाढती प्रकरणं पाहता डॉक्टरही चिंतेत आहेत. मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. फोर्टिस रुग्णालायचे सीनिअर कन्सलटंट पीडियाट्रिशिअन डॉ. जेसल शाह यांनी सांगितलं, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील कित्येक मुलं कोरोनाच्या विळख्यात आली होती. कोरोनातून बऱ्या झालेल्या मुलांमध्ये आता ब्लॅक फंगस दिसून येतो आहे. रुग्णालयात उपचार घेण्यासाटी आलेल्या दोन मुलींमध्ये ब्लॅक फंगस आढळला. जेव्हा त्या दोघी आमच्याकडे आल्या, तेव्हा 48 तासांतच त्यांचा एक डोळा काळा पडला. त्यांचं नाक, डोळे आणि सायनसमध्ये ब्लॅक फंगस पसरला होता. सुदैवाने ब्लॅक फंगसचा परिणाम मेंदूपर्यंत झाला नव्हता. हे वाचा - कोरोनामुक्त झाल्यानंतरही स्वतःला जपा; डॉक्टरांनी सांगितले ठणठणीत होण्याचे उपाय सहा आठवडे या मुलींवर उपचार केल्यानंतर शेवटी त्यांचा एक डोळा आम्हाला काढाला लागला. डोळे आणि कॅन्सर सर्जन डॉ. पृथेश शेट्टी यांनी सांगितलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांवरही ब्लॅक फंगसचा परिणाम दिसतो आहे. दोन्ही प्रकरणांत आम्हाला मुलांचे एक डोळे काढावे लागले. कोरोना संक्रमित अशा आणखी 14 आणि 16 वर्षांच्या मुलींमध्येही ब्लॅक फंगस सापडला. तपासणीत कोविडनंतर त्यांना मधुमेह झाल्याचं दिसलं. 14  वर्षांच्या मुलीचा एक डोळा काढावा लागला. तर 16 वर्षांच्या मुलीच्या पोटाच्या एका भागात ब्लॅक फंगस सापडला आहे. mucormycosis ने 6 महिन्याच्या मुलीला हिरावलं काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमध्ये (Ahamadnagar) अवघ्या 6 महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाल्याची घटना घडली. राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डी येथे राहणाऱ्या कोरके यांच्या कुटुंबातील सहा महिन्याच्या श्रद्धा कोरके या मुलीला कोरोनाची लक्षणे असल्याने तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. मात्र उपचाराअंती चिमुरडीने कोरोनावर मात केली. कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला होता. पण म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसून आली. त्यामुळे कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. हे वाचा - 65 वर्षीय महिलेमध्ये आढळला 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही लागण व्हेंटिलेटवर असणाऱ्या श्रद्धाला लोणी येथील प्रवरा हाॉस्पिटलमध्ये 13 तारखेला दाखल करण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्युकरमायकोसीस जास्त प्रमाणात पसरल्याने तिच्यावर सर्जरी करणंही शक्य नव्हतं. अथक प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना अपयश आले आणि तीचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. एवढ्या लहान मुलीला म्युकरमायकोसीस होण्याची आणि त्यात मृत्यू होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेण्याचं आवाहन डॉ. भालवार यांनी केलं.
    Published by:Priya Lad
    First published: