65 वर्षीय महिलेमध्ये आढळला कोरोनाचा 'डेल्टा प्लस' व्हेरियंट, लशीचे दोन्ही डोस घेऊनही झाली लागण

Corona नंतर या आजाराची वाढली भिती

एका 65 वर्षीय महिलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची (Delta Plus Variant) लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली आहे.

  • Share this:
    भोपाळ 18 जून : कोरोना (Coronavirus) दिवसेंदिवस अधिक रौद्र रुप धारण करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी (2nd Wave of Coronavirus) जबाबदार ठरलेल्या डेल्टा व्हेरियंटचं अधिक गंभीर रुप म्हणजेच डेल्टा प्लस व्हेरिंयही (Delta Plus Variant) आता भारतात आढळून आला आहे. अशात आता भोपाळमध्ये एका 65 वर्षीय महिलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली आहे. पंढरपूरच्या सोमनाथची इस्रोमध्ये निवड, राज्यातून निवड झालेला एकमेक विद्यार्थी मध्य प्रदेशमध्ये दुसऱ्या लाटेचा प्रसार आता कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे, प्रसार रोखण्यसाठी घालण्यात आलेले निर्बंधही शिथील केले जात आहेत. अशातच आता ही माहिती समोर आल्यानं चिंतेत भर पडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची कोरोना चाचणी 23 मे रोजी केली गेली होती आणि बुधवारी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रातून प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये या महिलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलं. मासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग म्हणाले की, एकाच महिलेला वेगवेगळ्या व्हेरियंटची लागण झाल्याची पुष्टी केली गेली आहे, मात्र त्यांनी त्याबद्दल अधिक माहिती दिली नाही. ते म्हणाले, की मध्य प्रदेशमध्ये कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठीच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, मात्र चाचण्यांची संख्या कमी केलेली नाही. ते पुढे म्हणाले, की भारतात सर्वात आधी आढळलेला डेल्टा व्हेरियंट आता डेल्टा प्लसमध्ये रुपांतरित झाल्याची भीती आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published: