मुंबई, 18 जून : कोरोनातून (Coronavirus) बरं झाल्यानंतरही आयोसेलेशनचा कालावधी संपल्यानंतर किंवा कोरोना सेंटर, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेक रुग्णांना अँझायटी, अशक्तपणा, सतत खोकला अशा समस्या जाणवतात. त्यामुळे पोस्ट कोविड रिकव्हरी पीरिअड (Post covid recovery period) म्हणजे कोरोनातून बरं झाल्यानंतरच्या काळात जीवनशैली कशी असावी, आहार कसा असावा? काय काळजी घ्यायला हवी? असे बरेच प्रश्न पडतात. कोरोनानंतर लवकर बरं होण्यासाठी या काही टीप्स. (Post covid care) होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी लक्षणं दिसल्यानंतर किंवा लक्षणं दिसत नसतील तर कोरोना टेस्ट केल्यानंतर कमीत कमी 10 दिवसांनी आयसोलेशनमधून बाहेर यावं. रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यासाठीसुद्धा हाच नियम आहे. होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर चाचणीची गरज नाही. 1) शरीरातील ऑक्सिजनची पातळी ऑक्सिमीटरच्या सहाय्याने सतत तपासत राहा. सामान्य खोलीच्या तापमानात शरीरातील ऑक्सिजन 94 टक्क्यांपेक्षा जास्त असावं. 2) सतत खोकला तर येत नाही ना, श्वास घ्यायला त्रास तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवा. 3) शरीराचं तापमान नियमित तपासा. 4) मधुमेही रुग्णांना सातत्याने रक्तातील साखरेची पातळी तपासत राहावी लागते. पण कोरोनामुळेही रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे तीन दिवसांतून एकदा रक्तातीतल साखरेची पातळी तपासा आणि गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे वाचा - मासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी? 5) हायपरटेन्शनसारखी गुंतागुंत होऊ नये, यासाठी रक्तदाबही सातत्याने तपासत राहा. 6) पुरेसा आराम करा. जेणेकरून शरीरात ऑक्सिजनचं संतुलन कायम राहिल. 7) शरीर हायड्रेट ठेवा. यासाठी पाणी, नारळपाणी, ज्युस, सूप प्या. पाणीयुक्त फळांचं सेवन करा. शरीर हायड्रेट राहिल्यास लवकर बरं होण्यास मदत होते. 8) दूध, चीज, शेंगदाणे, डाळी, अंडी, मांस अशा प्रोटिनयुक्त पदार्थांचा सेवन करा. 9) श्वसनसंबंधी एक्सरसाईज, योगा, ध्यानधारणा करा आणि मन शांत ठेवा. 10) शरीराला जास्त थकवू नका. जास्त काम केल्याने शरीराला जास्त ऑक्सिजन लागतं. शरीराची ऑक्सिजनची गरज कमी करण्यासाठी पुरेसा आराम करा. हे वाचा - कोरोनामुक्त झाल्यानंतर दात-हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का? 11) डिस्चार्ज मिळाल्यानंतर 7 दिवसांत किंवा ताप, श्वास घ्यायला त्रास, सतत खोकला अशी लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांना भेटा. 12) सर्वात आधी CBC ही रक्तचाचणी करून घ्या. त्यानं डॉक्टरांच्या सल्लानुसार इतर चाचण्या करा. 13) डॉक्टरांनी सल्ला दिल्यास, तीन महिन्यांनी पुन्हा शरीराचा सीटी स्कॅन करा. जेणेकरून इन्फेक्शननंतर फुफ्फुसाला पोहोचलेली हानी किती बरी होते आहे, हे समजण्यास मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.