मुंबई, 7 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल नवी मुंबईत एका भाजप (BJP) पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) असं या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी पोस्ट त्याने सोशल मीडियावर (Social Media) केली होती. तसेच ती पोस्ट व्हायरल (viral) करण्याचादेखील प्रयत्न केला होता. या आक्षेपार्ह पोस्टमुळे काही शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कोपरखैरणे पोलिसांनी (Koparkhairane Police) याप्रकरणी कलम 154 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संदीप म्हात्रे याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्ते संदीप म्हात्रे यांची पत्नी कोपरखैरणे भागात नगरसेविका आहेत. संदीप म्हात्रे कोपरखैरणे भागात त्यांच्या सामाजिक कामांमुळे प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. संबंधित पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी म्हात्रे यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. म्हात्रे यांच्या काही नातेवाईकांनी त्यांच्यावतीने शिवसैनिकांची माफी मागितली होती. पण संदीप म्हात्रे यांनी माफी मागितली नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी पोलीस ठाणे गाठलं. हेही वाचा : किरीट सोमय्यांनी एक तर 100 कोटी द्यावे, नाहीतर माफी मागावी : अनिल परब शिवसैनिकांनी आक्षेपार्र पोस्ट प्रकरणी कौपरखैरणे पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं. त्यांनी सर्व प्रकरण समजून घेतलं. परिस्थिती चिघळू नये किंवा कोणताही वाद वाधू नये यासाठी त्यांनी थेट कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी संदीप म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलीस संदीप म्हात्रेंना आता कोर्टात हजर करतील. यावेळी त्यांना जामीन मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. प्रसिद्धीसाठी आक्षेपार्ह पोस्ट? संदीप म्हात्रे यांचा एकंदरीत स्वभाव आणि कार्यपद्धतीने ते प्रसिद्ध आहेतच. मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवून असा त्यांचा प्रयत्न होता. येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी अशापद्धतीने आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि त्यातून मतांचं गणित बांधता येईल, असा प्रयत्न होता. पण त्यांचा हा प्रयत्न अंगलटी आला, अशी चर्चा सध्या कौपरखैरणेत सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.