बालाजी निरफळ, प्रतिनिधी, उस्मानाबाद उस्मानाबाद, 7 जानेवारी : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप (allegations of corruption) केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांचा जास्त समावेश आहे. सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परब यांचा कोकणात (Konkan) समुद्र किनाऱ्याजवळ अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर अनिल परब यांना ईडी (ED) चौकशीला देखील सामोरं जावं लागलं होतं. या दरम्यान अनिल परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा केला होता. याच प्रकरणावरुन अनिल परब यांनी सोमय्या यांना 100 कोटी रुपये द्या, नाहीतर माफी मागा, असा इशारा पुन्हा एकदा दिला आहे. परब आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये (Tuljapur) आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. अनिल परब नेमकं काय म्हणाले? “कोकणात जे रिसॉर्ट आहे, त्याबद्दल त्यांना विचारलं पाहिजे. मी वारंवार याबाबत खुलासा केलेला आहे. महाराष्ट्र सरकारकडे याबाबत सर्व नोंदी आहेत. महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी याबाबत जो काही तपास केलेला आहे त्यामध्ये ही गोष्ट अतिशय स्पष्ट झालेली आहे की, या रिसोर्टशी माझा काहीच संबंध नाही. कागदोपत्री आयकर विभाग, ईडी सगळीकडे याबाबत चौकशी झाली पाहिजे. यामधून खरं निषपण्ण झालेलं आहे. तरीदेखील सोमय्या माझ्याविरोधात आरोप करत आहेत. याबद्दल मी त्यांच्याविरोधात मानहाणीचा दावा केलाय. या दाव्यामध्ये एकतर त्यांना मला 100 कोटी द्यावे लागतील, नाहीतर माफी मागावी लागेल”, असं अनिल परब म्हणाले. हेही वाचा : OBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचं आरक्षणही कायम, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा यावेळी अनिल परब यांना एसटी कर्मचाऱ्यांचं सुरु असलेल्या संपाबाबतही विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं. “एसटी कर्मचाऱ्यांनो आत्मदहन करु नका. आपल्या मागण्या ठाम पद्धतीने मांडा. तुम्हाला मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. पण संप करुन ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरु नका. आपण आत्मदहन करतो आणि आपले कुटुंब उघड्यावर येतं. आपल्या मागण्या खंबीरपणे मांडा. त्या मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे. पण मागण्या वेगळ्या पद्धतीने मांडल्या पाहिजेत. त्याचे अनेक मार्ग आहेत. पण संप करुन ग्रामीण भागातील जनतेचे हाल करु नका”, असं अनिल परब यांनी आवाहन केलं. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर नेमके काय आरोप केले होते? “अनिल परब यांनी मंत्री असूनही बेकायदेशीर रिसॉर्ट त्यांनी बांधलं त्याचा मालमत्ता करही भरला नाही. मंत्री महोदय हे स्वतः बेकायदेशीर बांधकाम करतात आणि त्यांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री करत आहेत”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. “अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. असं असूनही असा माणूस मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो? अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. एवढंच नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब या दोघांनाही तुरुंगात जावंच लागणार”, असंही किरीट सोमय्या म्हणाले होते. हेही वाचा : अखेर मिळालं उत्तर..! म्हणून डोक्यावर घोंघावत असतात डास; वाचा Interesting Answer “अनिल परब यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीसही बजावली होती. एका सीएने अधिकृतरित्या महाराष्ट्र सरकाला अहवाल दिला, की हे रिसॉर्ट बांधण्यात 5 कोटी 42 लाख 44 हजार 200 रुपये खर्च झाले आहेत. अनिल परब यांनी एक दमडीचा खर्च देखील स्वतःच्या खात्यात दाखवलेला नाही. मग रिसॉर्ट बांधण्याचा पैसा कुठून आला?”, असा सवाल सोमय्यांनी केला होता. “सचिन वाझेचा वसुलीमधला पैसा होता? किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर अनिल परब यांनी स्वतःच्या मित्राला, सदानंद कदमच्या नावाने हा रिसॉर्ट 1 कोटी रुपयात करून टाकला. बांधकामाचा खर्च 5 कोटी 42 लाख बाजारभाव ग्रामपंचायतीनुसार 21 कोटी आणि 1 कोटीत अॅग्रीकल्चर लेन म्हणून विकला”, असाही आरोप सोमय्यांनी कागदपत्रं दाखवून केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.