मुंबई 18 जानेवारी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचा वाद शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. सावरकरांना विरोध करणाऱ्यांना थेट अंदमानात पाठवायला पाहिजे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांचा रोख हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर होता असं मत व्यक्त केलं जातंय. महाआघाडीचं सरकार वेग पकडत असतानाच संजय राऊतांनी पुन्हा एकदा असं विधान करण्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली जातेय. राऊतांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारलं आहे. त्यांनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केलं पहावं लागेल असंही आदित्य यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, संजय राऊतांची मतं ही वयक्तिक असतात. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेस-शिवसेनेची युती कायम आहे. दोन वेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात. भारतरत्नं कोणाला द्यायचं हे भाजपच्या हातात…त्यांनी द्यावं. मात्र, इतिहासावर किती दिवस बोलणार. देशात दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा करायला हवा – मोहन भागवत इतिहासाकडून शिकावं, प्रेरणा घ्यावी आणि आजचे प्रश्न सोडवावेत. मात्र, सावरकरांसारखे माहापुरुष ही रत्नेच आहेत. त्यांनाही असे वाद पाहून वाईट वाटेल. देशात जे काही सध्या चाललंय ते बघुन महापुरुषांना लाज वाटेल. देशाची अर्थव्यवस्था बघा. देशातील समस्या बघा. त्यावर काम करणं गरजेचं.
मनसेचं नवं पोस्टर, राज ठाकरे करणार नव्या वादळाची सुरुवात
मुंबई नाईटलाईफबाबत माहिती न घेता विरोधक बोलतायेत. आपण जे सुरु करतोय ते नाईट लाईफ नाही, मुंबई 24 तास ही त्यामागची कल्पना आहे. याला नाईट लाईफ म्हणा किंवा मुंबई 24 तास म्हणा. ड्राय डे आणि मुंबई 24X7 मध्ये काहीही संबंध नाही. लंडनची नाईट टाईम इकॉनॉमी 5 बिलीयन पाऊंडस् आहे. हॉटेल्स, मॉल खुले राहिले तर बेस्ट, ओला, उबर, टँक्सी सुरु राहतील. मुंबईत रोजगांर वाढवण्याच्या दृष्टीनं मुंबई 24 तास सुरु ठेवणं ही संकल्पना आहे. मॉल, मिल कपाऊंड परिसरात कुठेही रहिवासी परिसर नाही. त्यामुळे, रहिवाशांना याचा त्रास होणार नाही.