शिर्डी विरुद्ध पाथरी, साईबाबांच्या जन्मस्थळावरून का होतोय वाद?

शिर्डी विरुद्ध पाथरी, साईबाबांच्या जन्मस्थळावरून का होतोय वाद?

रविवारपासून शिर्डीत बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद आता आणखी चिघळणार असं दिसत आहे.

  • Share this:

शिर्डी, 18 जानेवारी: रविवारपासून शिर्डीत बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद आता आणखी चिघळणार असं दिसत आहे. साईबाबांचा पाथरी गावात जन्म झाल्याचा दावा पाथरीकर करत आहेत. तर साईबाबांनी कधीही स्वतःचा धर्म, जात सांगितली नाही जन्मस्थळ सांगितले नाही. त्यामुळे साईभक्त आणि सरकारची दिशाभूल पाथरीचे लोक करत असल्याचा आरोप शिर्डीकरांनी केला. त्यामुळे पाथरी विरुद्ध शिर्डीकर असा वाद सुरू झाला आहे.

शिर्डी आणि पाथरी यांच्या वादावर अनेक चर्चा पुढे येताना पाहायला मिळत आहेत. साईबाबा नेमके कोण होते? त्यांचं जन्मस्थळ कोणतं होतं याबद्दल दावे प्रतिदावे केले जात आहेत. 1975 रोजी ब्रिटीशांना बाबा हे स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत असावेत, असे वाटले. त्यामुळे गुप्तहेर पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. असा काही लोकांनी दावा करण्यात आला आहे. तर हा दावा खोटा असून बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम् इथे झाला असल्याचा प्रतिदावा करण्यात आला आहे. एका तामीळ चरित्रात साईबाबांचे वडील साठे शास्त्री तर आई लक्ष्मीबाई असल्याचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे बाबा हे गुजराती ब्राह्मण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जन्मल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही अनेकदा बाबांच्या जन्मस्थळाबद्दल दावे झाले.

1918 साली बाबांनी समाधी घेतल्यांचं सांगितलं जातं त्यावेळी त्यांच्या भक्तांनी शिर्डीत विश्वस्त मंडळ स्थापन केलं. त्यावेळी पाथरी गावातील कुणाची समावेश नव्हता. त्यांच्या सोहळ्यालाही गावातील कोणीच आलं नव्हतं. शिर्डी हेच साईबाबांचे सर्वकाही असल्याचे जगभरातील साईभक्त मानतात. त्यामुळे या दाव्यांना अर्थ राहिलेला नाही, असे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हेही वाचा-'महात्मा गांधींना भारतरत्न नाही', सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचं जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्यावर शिर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांनी बंदचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला.

साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. मात्र आता साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना शिर्डीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे शिर्डी आणि पाथरीतला वाद सामोपचारानं सोडवण्याची गरज आहे.

साईबाबांबद्दलचा 'हा' उल्लेख खटकला

साईबाबांनी हयातीत कधीही जन्मस्थळ, जात, धर्म उघड केला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्हयातील पाथरीचा विकास करणार’ असा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्त नाराज झाले आहेत.

यापूर्वी राष्ट्रपतींनी साईसमाधी शताब्दी सोहळ्यात साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. यावर नाराज झालेल्या शिर्डीकरांनी थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थळाचा खुलासा केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीच थेट साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने शिर्डीकर व साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. पाथरीच्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पाथरी या गावाचा ‘साईबाबांचे जन्मस्थान’ असा उल्लेख करणे आक्षेपार्ह असल्याचे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे, असे शिर्डीकरांचे मत असल्याचे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे साईबाबांचे भक्त आहेत, त्यांनी शिर्डीकरांच्या या भावना जाणून घ्याव्यात, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यासंबंधीची भूमिका गावकऱ्यांनी शनिवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा-Delhi assembly election : भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

First published: January 18, 2020, 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading