संजय राऊतांचा 'तो' व्हिडीओ पाहून काय म्हणाले नितेश राणे, केली खालच्या पातळीवर टीका

संजय राऊतांचा 'तो' व्हिडीओ पाहून काय म्हणाले नितेश राणे, केली खालच्या पातळीवर टीका

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. दरम्यान, संजय राऊत यांची कन्या पुर्वशीने दोन दिवसांपूर्वी वडिलांचा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. या व्हिडीओत संजय राऊत चक्क हर्मोनिअम वाजवताना दिसत आहेत. याच व्हिडीओवर आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्म वर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली.', अस ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

हे आहे नितेश राणेंच ट्वीट...

काय आहे हे प्रकरण?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सगळेच घरात बसून आहेत. या दरम्यान, संजय राऊत यांची कन्या पुर्वशी राऊत हिने तिच्या वडिलांच एक अनोखं रुप जगासमोर आणलं. पुर्वशीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर वडिलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात संजय राऊत चक्क पेटी वाजवताना दिसत आहे. 'सामना'चे संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून संजय राऊत केवळ फटकारे मारतात असा एक गैरसमज आहे. ते रूक्ष असावे असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण ते तसे नाहीत. ते राजकारणापलीकडे वाचतात , ऐकतात आणि बोलतात, असंही पुर्वशी हिने म्हटले आहे.

काय आहे पुर्वशीची फेसबुक पोस्ट..

''सामना'चा संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून तो फक्त फटकारे मारतो असा एक गैरसमज आहे. तो रूक्ष असावा असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण तो तसा नाही. तो राजकारणा पलीकडे वाचतो , ऐकतो आणि बोलतो. तो आजही सैगल , बेगम अख्तर , चंद्रू आत्मा ऐकतो.. ऐकताना गुणगुणतो....ते गुणगुणणे मनापासून असते. तो मूडमध्ये असला की त्याची बोटे टेबलावर तालात थिरकतात.. आज खुप वर्षांनी तो सक्तीने घरी होता. त्याचे रेग्युलर वाचन आणि लिखाण आटोपल्यावर त्याने त्याची लाडकी पेटी बाहेर काढली..ती स्वतः साफ केली... आणि आजची आमची संध्याकाळ संगीतमय करून टाकली.''

First published: March 26, 2020, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading