मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नियम म्हणजे नियम! विना मास्क फिरणाऱ्या भाजप आमदाराची फाडली पावती

नियम म्हणजे नियम! विना मास्क फिरणाऱ्या भाजप आमदाराची फाडली पावती

मंत्रालयात पोलिसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई केली आहे.

मंत्रालयात पोलिसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई केली आहे.

मंत्रालयात पोलिसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई केली आहे.

मुंबई, 14 डिसेंबर : राज्यावर कोरोनाचे (corona) नवे संकट ओमायक्रॉनचे संकट घोंघावत आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य  सरकारकडून कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केले आहे. पण, लोकप्रतिनिधींना या नियमांचा विसर पडला आहे. मंत्रालयात (mantralaya mumbai) बिनधास्तपणे विनामास्क (mask) भिरणाऱ्या भाजपच्या आमदारवर (bjp mla) पोलिसांनी कारवाई केली आहे.

मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे पालक करावे असं वारंवार सांगितले जात आहे. पण, सर्वत्र या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. मंत्रालयात सुद्धा असा प्रकार घडला आहे.  विना मास्क फिरणाऱ्या भाजप आमदारांवर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.

मंत्रालयात पोलिसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई केली आहे. मंगेश चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत.  मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभा आवारात आढळली ब्रिटिशकालीन फाशी देण्याची खोली

मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी २०० रुपयांचा दंड ठोकला आहे. आमदारांवर कारवाई करणाऱ्या कर्तव्य दक्ष पोलिसांचं मंत्रालयात कौतुक होतं आहे. आपल्यावर कारवाई करण्यात आली, याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असता असं सांगून ठोठावलेला दंड भरला.

दरम्यान, महाराष्ट्रावर ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. तर डोंबिवलीमध्ये आढळलेला पहिला रुग्ण हा ओमायक्रॉनमुक्त झाला आहे.  तर रविवारी  नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता. तेव्हा या व्यक्तीचा कोविड चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर जीनोमसिक्वेन्सीसाठी रुग्णाचा अहवाल पाठवण्यात आला होता. आज त्या रुग्णाचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अशी माहिती पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी दिली.

First published: