'मराठा आरक्षण मोर्चाला मुका मोर्चा म्हणणाऱ्यांना...', भाजपने केला शिवसेनेवर पलटवार

'मराठा आरक्षण मोर्चाला मुका मोर्चा म्हणणाऱ्यांना...', भाजपने केला शिवसेनेवर पलटवार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : 'मराठा आरक्षण मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे, छत्रपतींच्या वंशजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या संजय राऊतांना अशा विषयावर बोलण्याचा अधिकार नाही,' असं म्हणत भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून पुन्हा एकदा देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यसभेत नवनियुक्त सदस्य शपथ घेत असतानाच छत्रपतींच्याच वंशजांनी ' जय भवानी, जय शिवाजी' म्हटल्यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्ली ते गल्ली राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला होता.

काय म्हणाले होते संजय राऊत?

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अदयाप घोषणा नाही,' असा टोला ट्विटरवरून संजय राऊत यांनी लगावला होता.

नायडूंच्या बचावासाठी उदयनराजेंनीच पुढे केली ढाल

'ज्यांनी आक्षेप घेतला ते नेते काँग्रेस की राष्ट्रवादीचे मला माहीत नाही.जे घडले नाही ते भासविण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी विनंती आहे. काँग्रेसच्या सदस्याने का आक्षेप घेतला याचे उत्तर मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला विचारा. आक्षेप घेताना राज्यघटनेचा आधार घेतला. नायडू यांनी चुकीचे केले नाही,' असं म्हणत उदयनराजेंनी व्यंकय्या नायडू यांची पाठराखण केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 23, 2020, 3:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading