मुंबई, 02 डिसेंबर : कोरोनाच्या परिस्थितीत भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रकृती बिघडल्यामुळे कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. पण, आता खुद्द पंकजा मुंडे यांनी ‘आपली कोरोनाची ( Corona Test) चाचणी ही निगेटिव्ह आली आहे’, अशी माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या सर्दी आणि ताप आला आहे, त्यामुळे आयसोलेट होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आज कोविडची चाचणी केली असता रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. खुद्द पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून सांगितले की, ‘माझी कोविड-19 (covid-19) ची टेस्ट निगेटिव्ह आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार.’
माझी covid ची टेस्ट negative आहे ..ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार !! मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन मगच सार्वजनिक कार्यक्रमांना जाईन ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 2, 2020
तसंच, ‘मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा कोरोनाची चाचणी करणार आहे आणि मगच सार्वजनिक कार्यक्रमांना जाईन’ अशी माहितीही पंकजांनी दिली. मधमाशांचा विमानावर हल्ला, VIDEO पाहून अंगावर येईल काटा पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पंकजा यांनी खबरदारी घेत आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांचे कार्यकर्ते चिंतातुर झाले होते. त्यांचे भाऊ आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही पंकजा यांना फोन करून तब्येतीची विचारपुस केली होती. तसंच, ‘या आजारात होणार त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी’ घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना दिला होता.