मधमाशांचा विमानावर हल्ला, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

मधमाशांचा विमानावर हल्ला, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

मधमाशांना हटवण्यासाठी साधारण 1 तासाचा वेळ गेला. ही धक्कादायक घटना कोलकाता विमानतळावर घडल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 डिसेंबर : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडं असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बऱ्याचदा या मधमाशा एकत्र झुंडीनं सगऴीकडे हल्ले देखील करतात. घर किंवा झाड नाही तर आता चक्क मधमाशांनी विमानावर हल्ला केला आहे. या घटनेचे अंगावर काटा आणणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

विस्तारा एअरलाइनच्या दोन विमानांवर हजारो मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे तासभर वाहनाला विमानतळावरच थांबून राहावे लागले. एक विमानाच्या खिडकीला तर दुसऱ्या विमानावर या मधमाशांनी कब्जा केल्याचं या व्हिडीओ आणि फोटोमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.

एअरलाइनसोबत संपर्कात असलेल्या एक अधिकाऱ्यानं रविवारी संध्याकाळी आणि सोमवारी संध्याकाळी मधमाशांनी विमानावर हल्ला केल्याच्या दोन घटना समोर आल्याचं सांगितलं. या घटनेमुळे नागरिक आणि कर्मचारी आश्चर्यचकित झाले तर दुसरीकडे प्रवाशांच्या अंगावर काटा देखील आला. त्यांना हटवण्यासाठी कर्मचाऱ्यांना बरेच कष्ट देखील घ्यावे लागले. मधमाश्यांमुळे विमानाने सुमारे एक तास उशीर उड्डाण घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

हे वाचा-अग्निशमन दलाच्या जवानाला गायीनं शिंगावर धरून आपटलं, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

सोशल मीडियावर या व्हिडीओला आतापर्यंत 28 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. या मधमाशांना हटवण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाण्याचा फवारा मारावा लागला. मधमाशांना हटवण्यासाठी साधारण 1 तासाचा वेळ गेला. ही धक्कादायक घटना कोलकाता विमानतळावर घडल्याची माहिती मिळाली आहे.

दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा विस्ताराच्या ग्राउंड स्टाफचे कर्मचारी उड्डाण करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा मधमाशांनी केलेला हल्ला दिसला. हे विमान पोर्ट ब्लेअरला जाणार होते. पुन्हा मधमाश्या काढण्यासाठी पाण्याच्या जेटची मदत घेण्यात आली, त्यानंतर साडेदहा वाजता विमानाचे उड्डाण करण्यात आलं. अनेक युझर्सनी यावर भन्नट कमेंट्स केल्या आहेत. मधमाशांना देखील लांबचा प्रवास करायचा असेल असं एक युझरनं म्हटलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 2, 2020, 11:55 AM IST

ताज्या बातम्या