Home /News /mumbai /

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

' जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात आणि...'

' जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात आणि...'

पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

    मुंबई, 29 एप्रिल: भाजपच्या (BJP) नेत्या आणि माजी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाची (Corona test) लागण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे घरीच क्वारंटाइन (Quarantine) होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. माझ्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे. याधीही डिसेंबर महिन्यात पंकजा मुंडे यांची प्रकृती खालावली होती.  'सर्दी खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे त्यांनी isolate होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा तब्येत खालावल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रीतम मुंडे सुद्धा होमक्वारंटाइन चार दिवसांपूर्वी बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनाही कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यामुळे होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतलाय. 'बीड शहरात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक कोविड सेंटरला भेटी दिल्या, डॉक्टर आणि रुग्णांची चर्चा केली. आवश्यक त्या सूचना  देण्यात आल्या आहेत. योग्य ते काम करण्यास भाग पाडले आहे.  हे काम करून मी 18 तारखेला मुंबईत परतले. असताना अचानक माझी प्रकृती बिघडली आहे. 2 ते 3 दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागला आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे, पण रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Covid-19, Home quarantine, Pankaja munde

    पुढील बातम्या