मुंबई, 6 एप्रिल : भाजपचे नेते मोहित कंबोज हे त्यांच्या ट्विटमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांचे ट्विट चर्चेत आले असून त्यांनी हे ट्विट सुषमा अंधारे व राखी सावंत यांच्यावर केले आहे. यामध्ये त्यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याची टीका कंबोज यांनी केली आहे. तर या दोघी सनसनाटीमध्ये एकमेकींच्या स्पर्धक आहेत. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी सिनेमात आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजप आणि ठाकरे गट यांच्यामधील शाब्दिक वाद आता टोकाला गेलेला आहे. आता तर या पक्षातील नेत्यांचीच एकमेकांवर टीका करताना पातळी घसरल्याचे दिसून येत आहे. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करत. सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याचं म्हणत. दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचंही आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं …
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) April 6, 2023
एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में …..
दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा
सनसनी कौन मचाई गा !
सुषमा अंधारेंचा फडणवीसांना जशास तसे उत्तर फडणवीस साहेब तुमच्या घरात 2006 पासून घरात घुसलेली बाईला आधी त्याचा बंदोबस्त करा, मग घरात घुसण्याची भाषा करा, तुम्ही स्वत:ला काडतूस समजत असाल तर उद्धव ठाकरे हे तोफ आहे, तोफेसमोर काडतुसाचा निभाव लागत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिलं. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडीने काल (बुधवार) ठाण्यात महामोर्चा काढला. यावेळी सुषमा अंधारे यांनी जोरदार भाषण करत भाजपवर हल्लाबोल केला. वाचा - महाडिक आणि बंटी पाटील गटामध्ये राजारामच्या प्रचारात राडा, एकमेकांवर केले गंभीर आरोप बावनकुळे साहेब ज्या जोशात तुम्ही बोलला, याचा अर्थ संघटना तुमचं ऐकतंय. भाजपमध्ये तुमचा दबदबा आहे. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुमची इतकी हिंमत आहे मग तुमचं तिकीट फडणवीस यांनी का कापलं? तरीही त्यांचं म्हणणं असेल मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही. आम्ही चांगली माणसं आहोत. बावनकुळे साहेब तुम्हाला आवाहन देते, तुमचं काय आहे, हिंमत असेल तर 48 तासांमध्ये मातोश्रीवर या, असं चॅलेंजच सुषमा अंधारेंनी दिला. माननिय गृहमंत्र्यांना फडतुस म्हटल्यामुळे राग आला आहे. आम्ही तुम्हाला फडतुस म्हणू नये अशी अपेक्षा आहे, पण तुमच्या एक फडतुस आमदार बाई म्हणून उल्लेख करतो, त्याची तक्रार तुम्ही घेतली का? असा थेट सवाल सुषमा अंधारेंनी केला.