जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अखेर किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना, पुण्यात पोलीस अडवणार?

अखेर किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना, पुण्यात पोलीस अडवणार?

 दुसरीकडे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मुश्रीफ समर्थकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दुसरीकडे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मुश्रीफ समर्थकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दुसरीकडे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मुश्रीफ समर्थकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर : भाजपचे (bjp) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( hasan mushrif) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कोल्हापूरमध्ये सोमय्यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही सोमय्या कोल्हापूरला महालक्ष्मी एक्स्प्रेसने ( mahalaxmi express) रवाना झाले आहे. त्यामुळे पुण्यात सोमय्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. अन्यथा कोल्हापूरमध्ये मोठा राडा होण्याची चिन्ह आहे. किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं. पण, त्यानंतर बंदोबस्त हटवल्यानंतर सोमय्यांनी कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन केल्यानंतर सोमय्यांना पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता होती. पण, तसं घडलं नाही. त्यानंतर सोमय्या सीएसटी स्टेशनवर पोहोचले.  त्यानंतर ठाण्यात पोहोचले. तिथे त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना झाले. महालक्ष्मी एक्स्प्रेस रवाना झाली. कल्याण रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सोमय्यांना पोलीस अडवतील अशी शक्यता होती. पण, तसंही घडलं नाही. ganpati visarjan 2021 : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 2 तरुण बुडाले दुसरीकडे कोल्हापुर जिल्ह्यात 144 कलम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे. 20 सप्टेंबरला पहाटे 5 ते 21 सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. सोमय्यांना सुद्धा याबद्दल नोटीस बजावली आहे. जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्ताने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या जर कोल्हापुरात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे पोलिसांवर ताण पडण्याची चिन्ह आहे. सासरेबुवा झालेतरी उदित नारायणांची ती सवय सुटेना; सूनेसमोरच… तर दुसरीकडे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मुश्रीफ समर्थकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मुश्रीफ समर्थक कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.  जमावबंदी लागू असल्यामुळे मुश्रीफ समर्थकांना लागू आहे. विशेष म्हणजे, सोमय्यांनी मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातील साखर कारखान्यावर जाऊन पाहणी करणार आहे. या मतदारसंघात मुश्रीफ यांच्या मोठ्या प्रमाणात समर्थक आहे. त्यामुळे मोठा राडा होण्याची चिन्ह आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात