• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सासरेबुवा झाल्यानंतरही उदित नारायणांची ती सवय सुटेना; सूनेसमोरच....'कपिल शर्माच्या शो'त बिंग फुटलं

सासरेबुवा झाल्यानंतरही उदित नारायणांची ती सवय सुटेना; सूनेसमोरच....'कपिल शर्माच्या शो'त बिंग फुटलं

'द कपिल शर्मा शो'च्या (kapil sharma show) आगामी भागात गायक उदित नारायण (udit narayan), कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल पाहुणे म्हणून दिसतील. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या प्रोमोमध्ये होस्ट कपिल शर्माने उदित नारायण यांची चांगलीच फिरकी घेतली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : 'द कपिल शर्मा शो'च्या (kapil sharma show) आगामी भागात गायक उदित नारायण (udit narayan), कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल पाहुणे म्हणून दिसतील. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या प्रोमोमध्ये होस्ट कपिल शर्माने उदित नारायण यांची चांगलीच फिरकी घेतली. त्याने एका गोष्टीवर उदित नारायण यांना चांगलेच चिडवले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उदित नारायणही व्हिडिओमध्ये कपिलच्या चर्चेला उत्तर देत आहेत. उदित नारायण आणि त्यांचा टॉवेल एक जुना किस्सा आठवत कपिल शर्मा म्हणाला की, उदित नारायण हे त्यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत शेवटच्या वेळी शोमध्ये आले होते. तेव्हा कळले होते की, उदित हे घरात कपडे घालत नाही, तर फक्त टॉवेल बांधून फिरत असतात. त्यावरून कपिल उदित नारायण यांना चिडवत म्हणाला की 'आता सून घरी आली आहे, त्यामुळे त्या सवयीचा तुम्हाला खूप त्रास होत असेल.'
  सवय बदलेली नाही उदित नारायण यांनीही यावर मजेदार उत्तर दिले, 'मी अजूनही टॉवेलच बांधत असतो, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे ती सवय कधीच सुटणार नाही.' त्यावेळी तेथे उपस्थित कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांना आश्चर्य वाटले. त्यावेळी त्याचा पाय खेचत कुमार सानू म्हणाले, 'ते एका शेतकऱ्याचा मुलगा आहेत, त्यांनी कधीच शेत पाहिले नसेल पण त्यांनी टॉवेल नक्कीच पाहिला असेल.' हे वाचा - Bigg Boss Marathi 3 Live : आता होणार राडा! महेश मांजरेकरांनी तिघांना दिला बिग बॉसच्या घराचा सातबारा आदित्यचे डिसेंबरमध्ये लग्न झाले गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आदित्य नारायणने त्याची खूप जुनी मैत्रीण श्वेता अग्रवालसोबत मुंबईतील एका मंदिरात साध्या सोहळ्यात लग्न केले. ते 'शापित' च्या सेटवर भेटले आणि लग्नगाठ बांधण्यापूर्वी एक दशकासाठी रिलेशनशिपमध्ये होते. हे वाचा - चोर की सैतान? वृद्ध महिलेचा खून केला अन् कान कापून दागिने नेले चोरून, बुलडाण्यातील घटना या वर्षाच्या सुरुवातीला 'इंडियन आयडॉल 12' मध्ये आदित्य नारायणने खुलासा केला की त्याची आई दीपा नारायण झा यांनी त्याच्यासाठी आणि श्वेतासाठी कामदेवची भूमिका साकारली होती. आदित्यने म्हणाला की, 'सुरुवातीला मला खूप प्रेमानं, खूप विनम्रतेने अनेक वेळा नाकारण्यात आलं होतं.
  Published by:News18 Desk
  First published: