मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोणतीही टेस्ट नाही, तर कुत्रा वासाद्वारे सांगणार तुम्ही पॉझिटिव्ह आहेत की नाही?

कोणतीही टेस्ट नाही, तर कुत्रा वासाद्वारे सांगणार तुम्ही पॉझिटिव्ह आहेत की नाही?

श्वानाची वास घेण्याची क्षमता ही माणसांपेक्षा 10 हजार पटीने अधिक आहे. त्यामुळे श्वानांना ट्रेन करून आपण त्यांच्या हुंगण्याच्या शक्तीच्या मदतीने माणसाला कोरोना झालाय की नाही याचा अंदाज बांधू शकतो.

श्वानाची वास घेण्याची क्षमता ही माणसांपेक्षा 10 हजार पटीने अधिक आहे. त्यामुळे श्वानांना ट्रेन करून आपण त्यांच्या हुंगण्याच्या शक्तीच्या मदतीने माणसाला कोरोना झालाय की नाही याचा अंदाज बांधू शकतो.

श्वानाची वास घेण्याची क्षमता ही माणसांपेक्षा 10 हजार पटीने अधिक आहे. त्यामुळे श्वानांना ट्रेन करून आपण त्यांच्या हुंगण्याच्या शक्तीच्या मदतीने माणसाला कोरोना झालाय की नाही याचा अंदाज बांधू शकतो.

  • Published by:  Karishma Bhurke
लंडन, 26 ऑक्टोबर : कुत्रा नाकाद्वारे, त्याच्या हुंगण्याच्या क्षमतेमुळे पोलिसांना शोध कार्यात मदत करतो. परंतु कोरोना काळात देखील श्वानांचा यासाठी उपयोग होऊ शकतो, असं बोललं जात आहे. सध्या वैज्ञानिक यासाठी प्रयत्न करत असून कुत्रा कोरोनाच्या या संकटात महत्त्वाची भूमिका बजावेल असा त्यांना विश्वास देखील आहे. श्वानाची वास घेण्याची क्षमता ही माणसांपेक्षा 10 हजार पटीने अधिक आहे. त्यामुळे श्वानांना ट्रेन करून आपण त्यांच्या हुंगण्याच्या शक्तीच्या मदतीने माणसाला कोरोना झालाय की नाही याचा अंदाज बांधू शकतो. जगभरात यासाठी तयारीदेखील सुरु करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये यासाठी सरकार मदत करत असून, सरकारच्या साहाय्याने श्वान यासाठी किती फायदेशीर आहेत याचा अभ्यास शास्रज्ञ करत आहेत. त्यामुळे या पद्धतीने श्वानांद्वारे कोरोनाग्रस्त शोधण्यासाठी रेल्वे, विमानतळं, तसंच सार्वजनिक स्थळांवर त्यांचा उपयोग करता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेतील पेनिसिलिव्हेनियात यासाठी अभ्यासदेखील सुरू करण्यात आला आहे. अशा पद्धतीने मदत करतात श्वान जगभरात साडेअकरा लाख लोकांचे जीव घेणाऱ्या कोरोनाचे निदान वासावरून होऊ शकते का? यावर सध्या वैज्ञानिक काम करत आहेत. सामान्यपणे कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यास त्याच्या शरीरातून विशेष असा गंध बाहेर पडत असतो. याआधी देखील मलेरिया, बॅक्टेरियाचं संक्रमण आणि कॅन्सरचे विविध केमिकल श्वान वास घेऊन शोधू शकत असल्याचं समोर आलं आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमधील वैज्ञानिक यासाठी अभ्यास करत असून त्यांना काही प्रमाणात यशदेखील मिळालं आहे. फ्रान्समध्ये जून महिन्यात घेण्यात आलेल्या पीसीआर सॅम्पल्स घेण्यात आले होते. यावेळी काखेकडील भागातून येणाऱ्या घामाच्या सॅम्पल्सचा वास घेण्यास आणि ओळखण्यात श्वान सकारात्मकता दाखवली होती. याचबरोबर जुलैमध्ये जर्मनीत एका अभ्यासात सांगण्यात आलं, कोरोना रुग्णांच्या सानिध्यात आणि वेगळे ठेवण्यात आलेल्या व्यक्तींचा वास ओळखण्यात श्वान यशस्वी झालं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ एका आठवड्याच्या ट्रेनिंगमध्ये श्वानांनी ही कामगिरी केली आहे. का होत आहे हा अभ्यास - जर ही चाचणी यशस्वी झाली तर सध्या ज्या पद्धतीने कोरोनाची चाचणी केली जाते, त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. सध्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी अँटीजेन टेस्ट करावी लागते. यामध्ये रुग्णाच्या नाकातील स्वॅबचं सँपल घेणाऱ्या व्यक्तींना आणि रुग्णाला देखील त्रास होतो. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी देखील सॅम्पल्स घेणं आव्हानात्मक आहे. त्यामुळे श्वानाच्या मदतीने गंध ओळखून कोरोना आहे की नाही हे ओळखण्यात खूप मदत होणार आहे. (वाचा - माणसाच्या कवटीवर तब्बल 5 हजार वर्षांपूर्वी झाली होती मेंदूची शस्त्रक्रिया) श्वानांचा गैरवापर होत आहे? यामध्ये श्वानांचा कुठल्याही पद्धतीने गैरवापर होणार नसून एका अभ्यासात डिटेक्शन डॉग ट्रेनिंग सिस्टम डिव्हाईसचा वापर करण्यात आला. यामध्ये विविध प्रकारचे सॅम्पल्स ठेवण्यात आले होते. यामध्ये रॅन्डम कोरोना पॉझिटिव्ह सॅम्पल्सदेखील ठेवण्यात आले होते. यामध्ये श्वानांनी कोरोनाचा गंध ओळखल्यास त्यांना बक्षीस म्हणून विशेष आहार देण्यात येत होता. त्यामुळे हे श्वान ट्रेनिंगमध्येदेखील आधिक रुची दाखवत होते. जगभरात कोरोनासाठी ट्रेन श्वान सध्या फिनलँडमध्ये हेलसिंकी विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर सरकार हा प्रयोग राबवत आहे. सध्या श्वान कोरोनाचा गंध ओळखू शकतात की नाही हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. पण तरीदेखील यूएईमधील विमानतळांवर श्वानांना स्कॅनरप्रमाणे वापरलं जातं. हेलसिंकी विमानतळावर कुत्र्यांनी कोरोना निगेटिव्ह म्हटलेल्या एका महिलेने नंतर वैद्यकीय चाचणी केल्यावर कुत्र्यांचा अंदाज अचूक ठरल्याचं तिनं ट्विट करून सांगितलंय. या अभ्यासात काय आव्हाने या अभ्यासात अजूनही अनेक गोष्टी सिद्ध व्हायच्या आहेत. यामध्ये श्वान गंध ओळखू शकतो की नाही? त्याचबरोबर गर्दीमध्ये श्वान कोरोनाचा रुग्ण ओळखू शकतो? परफ्युम आणि घामाच्या वासाचा गंध ते ओळखू शकतात की नाही? हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. टाइम्समध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, या श्वानांचा वापर कोणत्या स्तरावरील कोरोना रुग्णांचा गंध ओळखण्यात करण्यात येणार आहे हे अजूनही समोर आलेलं नाही. पण लक्षणं नसलेल्या रुग्णांना ओळखण्यात या श्वानांचा वापर करण्यात येऊ शकतो.

वाचा - पाकिस्तानात आहे देवीचं हे शक्तिपीठ; जगभरातल्या भाविकांसह मुस्लीमही करतात उपासना)

जगभरात विविध आजारांचा गंध ओळखण्यात श्वान यशस्वी ठरत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच इतर व्हायरल आजारांचादेखील या पद्धतीने तपास लागू शकतो की नाही हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांमध्ये श्वान कोरोनाचा तपास करण्यासाठी स्कॅनरच्या रूपात आढळून येतील.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या