मालेगाव, 18 डिसेंबर: दाट धुक्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. सटाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघाताची घटना ताजी असताना शुक्रवारी पहाटे चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बस आणि गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला.
अपघात एवढं भयंकर आहे की, बसनं महामार्गाच्या कडेला उभी असलेली टॅक्सी आणि 2 टपऱ्यावर जाऊन पलटी झाली. धक्कादायक म्हणजे मॉर्निग वाक करणारा एक व्यक्तीचा बस खाली दबून मृत्यू झाला आहे.
हेही वाचा...‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या कांता प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी
मिळालेली माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ मजूर घेऊन जाणारी खासगी बस, गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि टॅक्सी यांचा विचित्र भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस महामार्गाच्या कडेला पलटी झाली. यात बससह रस्त्याच्या कडेला उभी असलेली टॅक्सी आणि दोन टपऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
मजूर घेऊन जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात, मॉर्निग वाक करणाऱ्या व्यक्तीचा चेंदामेंदा pic.twitter.com/CsRJf8khhv
— News18Lokmat (@News18lokmat) December 18, 2020
बसमध्ये 75 मजूर होते. सुदैवानं ते थोडक्यात बचावले. काही मजुरांनी किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आलं आहे. धुकेमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ट्रकमध्ये ही गॅस सिलेंडर होते. गॅस गळती झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असंही बोललं जात आहे.
हेही वाचा..नागपुरातील 'या' शैक्षणिक संस्थेला दणका, 7 कोटी 59 लाख पालकांना परत करण्याचे आदेश
दरम्यान, मुंबईत पार्किंगमध्ये उभी असलेली बसला अचानक आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मुंबईतील वडाळा रेल्वे स्टेशनसमोरील पार्किंगमध्ये एक खासगी बस उभी होती. तिला अचानक आग लागली. क्षणार्धांत संपूर्ण बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. सध्या पोलीस या घटनेसंदर्भात पुढील तपास करत आहे.