Home /News /mumbai /

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार मुंबईत आल्यानंतर गोंधळाची शक्यता, भाजप सतर्क, महत्त्वाची बैठक

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार मुंबईत आल्यानंतर गोंधळाची शक्यता, भाजप सतर्क, महत्त्वाची बैठक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुंबईत भाजपच्या सर्व आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. 36 विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला आहे.

मुंबई, 25 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटात घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: शिवसेनेच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री सर्व खासदार, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात व्यस्त आहेत. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील बैठकांवर बैठका घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही प्रचंड बैठका सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल तब्बल दोन तास बैठक झाली. ठाकरेंच्या 'मातोश्री' या निवासस्थानी ही बैठक पार पडली. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना भाजपकडूनही आता हालचालींना वेग येताना दिसतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल त्यांच्या 'सागर' या निवासस्थानातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते गुजरातला एका गुप्त बैठकीसाठी जावून आल्याची चर्चा आहे. ही गुप्त बैठक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातच्या वडोदरा येथे झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यानंतर आता मुंबईत भाजपच्या गोटात आणखी घडामोडी घडत आहेत. मुंबईत भाजपच्या सर्व आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. 36 विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विशेषत: मुंबईतील परिस्थितीवर भाजपची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुंबईत आल्यानंतर गोंधळाची शक्यता पाहता भाजपकडूनही प्रत्युत्तराची तयारी सुरु आहे. (आताची सर्वात मोठी बातमी, रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट? पुढील प्लान आखल्याची चर्चा) 36 मतदारसंघातून 50 हजार कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. ही फौज आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभी करण्याचा भाजपचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीच शक्ती प्रदर्शनासाठी या फौजचा वापर केला जाऊ शकतो. संबंधित बैठक ही मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व जबाबदारी भाजप नेते मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, नितेश राणे, अमित साटम यांच्यावर देण्यात आली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: BJP, Maharashtra News, Shiv sena

पुढील बातम्या