मुंबई 24 डिसेंबर : कोरोनाच्या (COVID-19) उद्रेकामुळे देशात आणि राज्यात अनेक महिने लॉकडाऊनची(Lockdown) स्थिती होती. त्या काळात अनेक व्यवसाय बुडाले अनेकांना रोजगार गमवावा लागला. मात्र याच काळात अवैध मद्य विक्रिचा सुळसुळाट झाल्याचं समोर आलं आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीतूनच ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. या महामारीच्या काळातही अवैध मद्य विक्री जोरात सुरु होती. शंभर दोनशे नाही तर या कोरोना काळात तब्बल 32 हजार 238 अवैध विक्रीचे गुन्हे दाखल झालेत. धक्कादायक म्हणजे या कारवाईत 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलाय आणि 19 हजार 462 अवैध मद्यविक्रि करणाऱ्यांना उत्पादन शुल्क विभागाने अटक केलीये. तर अवैध मद्यविक्री करता वापरण्यात आलेल्या 2 हजार 663 गाड्या देखील उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी ही माहिती दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल २०२० ते २२ डिसेंबर २०२० पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 32 हजार 238 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 19,462 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 74 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोरबच 2,663 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. हातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत 18,786 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 7,028 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर 34 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे आव्हान वाढलं अवैधपणे परराज्यातील मद्य विक्री बाबत आतापर्यंत एकूण 765 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 656 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर 13 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मद्यार्काची अवैध वाहतुकीबाबत एकूण 182 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 214 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर 4 कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.तसेच बनावट मद्य विक्रीचे एकूण 71 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 79 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर 2 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 22 डिसेंबर 2020 पर्यंत परराज्यातील अवैध मद्य जप्त करण्यात आलेले आहे. 4 डिसेंबर 2020 रोजी नाशिक येथे हरियाणा आणि गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 1,076 बॉक्स आणि 1 ट्रक असा एकूण 93 लाख 63 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 2 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 6 डिसेंबर 2020 रोजी नंदुरबार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 500 बॉक्स आणि 1 ट्रक असा एकूण 43 लाख 92 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 3 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच 6 डिसेंबर 2020 रोजी धुळे येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण 1250 बॉक्स आणि 2 वाहने असा एकूण 65 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Alert! अवघे 24 तास शिल्लक! वाहनांच्या रजिस्ट्रेशनसंबंधीत महत्त्वाचं काम केलं का? 17 डिसेंबर 2020 रोजी सोलापूर येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण 150 बॉक्स आणि मद्य बाटल्यावरील 20,000 बनावट लेबल असा एकूण 11 लाख 81 हजार 010 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 18 डिसेंबर 2020 रोजी पुणे येथे विविध मद्याच्या एकूण 710 बॉक्स,बिअरचे 190 बॉक्स आणि 1 ट्रक असा एकूण 56 लाख 48 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 3 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 23 डिसेंबर 2020 रोजी कणकवली येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे 2,700 ब.लि. मद्य आणि एक टेम्पो असा एकूण 21 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 15 डिसेंबर 2020 रोजी अंधेरी आणि वांद्रे येथून विविध ब्रॅण्डच्या परदेशी स्कॉच मद्याच्या एकूण 97 सिलबंद बाटल्या आणि 3 वाहने असा एकूण 10 लाख 23 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 6 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 16 डिसेंबर 2020 रोजी चेंबूर येथून बनावट विदेशी मद्याच्या एकूण 348 बाटल्या असा एकूण 22 लाख 04 हजार 392 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 2आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 17 डिसेंबर 2020 रोजी बनावट विदेशी मद्याच्या 20 बॉटल आणि एक रिक्षा असा एकूण 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 2आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.