मुंबई 24 डिसेंबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ घसरतो आहे. नव्या रुग्णांच्या संख्येतही फारशी वाढ दिसत नसून 3 ते 4 हजारंच्या दरम्यान दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. परिस्थिती आटोक्यात असली तरी विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचं आव्हान पुन्हा एकदा निर्माण झालं आहे. गुरुवारी राज्यात 3,580 नवे रुग्ण आढळले. 3,171 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 89 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 19,09,951 झाली आहे. तर 18,04,871 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
राज्याचा Recovery rate हा 94.5 टक्के एवढा झाला आहे. तर मृत्यू दर 2.57 एवढा आहे.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूमूळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून राज्य शासनाने रात्रीच्या वेळी संचारबंदी जाहीर केली आहे. कल्याणात 25 नोव्हेंम्बर ते 23 डिसेंम्बर पर्यंत 45 नागरिक ब्रिटनमधून परतले असून या नागरिकांची यादी राज्य शासनाने महापालिकेला धाडली असून या सर्वांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. तपासणी दरम्यान या नागरिकांमध्ये काही लक्षणे दिसल्यास या नागरिकांचे स्वॉब पुण्याच्या प्रयोगशाळेत धाडले जाणार आहेत.
Covid काळात हा HR मॅनेजर ठरला गरिबांसाठी सुपर हिरो! Rice ATM ने शेकडोंना आधार
कल्याण डोंबिवली मधील कोरोना रुग्णाचे प्रमाण वेगाने कमी होत असून आजमितीला केवळ 1000 रुग्ण उपचार घेत असून 55 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र या यादीमुळे मागील 9 महिन्यानंतर आता कुठे मोकळा श्वास घेत असलेल्या पालिका प्रशासनाची झोप उडाली असून आरोग्य विभागाची धावपळ वाढली आहे.
लस येताच कोरोनानं आपलं रूप बदललं आणि मग कोरोनाविरोधातील लस या नव्या कोरोनावर प्रभावी ठरेल का असा प्रश्न निर्माण झाला. पण ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाव्हायरसविरोधात अमेरिकेची कोरोना लस प्रभावी आहे, असा दावा अमेरिकेतील औषध कंपनीनं केला आहे.
नाशिक प्रशासन हादरलं! पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोरोनाची लागण
अमेरिकेतील मॉडर्ना (moderna) कंपनीनं तयार केलेली कोरोना लस. ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी आहे असा दावा मॉडर्ना कंपनीनं केला आहे. मॉडर्ना कंपनीच्या लशीला अमरिकेत आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही लस नव्या कोरोनापासूनही संरक्षण देईल असा विश्वास कंपनीला आहे.