मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी! MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही SEBC आरक्षण रद्द

मोठी बातमी! MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही SEBC आरक्षण रद्द

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) आरक्षण रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

मुंबई, 6 जानेवारी : MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) आरक्षण रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. 2019 च्या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरलं जाणार आहे.

2019च्या पोलीस भरती संदर्भात शासनाचा नवा आदेश आला आहे. यंदाची पोलीस भर्ती ही अंदाजे तीन हजार पदांसाठी होणार होती. पण कोविडमुळे गेल्या वर्षभरात पोलीस भर्तीच झालेली नाही. गेल्या सप्टेंबरमध्येच गृहमंत्र्यांनी मेगा पोलीस भर्तीची घोषणा केली होती. राज्यात 12 हजार 528 पदांसाठी पोलीस भर्ती होणार असली तरी  मराठा संघटनांच्या विरोधामुळे अद्याप नव्या पोलीस भर्तीची जाहिरातच निघालेली नाही.

राज्यात 12,528 पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. लवकरच राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील उपरोक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.

हे ही वाचा-VIDEO : पोलिसांकडून दुर्लक्ष; घरात घुसून मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचा खळखट्याक

मेगा पोलीस भरती

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले होते. पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

First published:

Tags: Job, Police