मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /पोलिसांनी केली नाही कारवाई; घरात घुसून मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचा खळखट्याक, पाहा VIDEO

पोलिसांनी केली नाही कारवाई; घरात घुसून मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचा खळखट्याक, पाहा VIDEO

वारंवार पोलिसांना सांगितलं...जिल्हाधिकारी आणि उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकांनाही विनंती केली. त्यानंतर मात्र...

वारंवार पोलिसांना सांगितलं...जिल्हाधिकारी आणि उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकांनाही विनंती केली. त्यानंतर मात्र...

वारंवार पोलिसांना सांगितलं...जिल्हाधिकारी आणि उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकांनाही विनंती केली. त्यानंतर मात्र...

सांगली, 6 जानेवारी : तासगाव शहरातील एका घरात सुरू असलेल्या मटक्याच्या अड्डयावर  मनसेच्या महिला कार्यकर्त्यानी (MNS women activists ) खळखट्याक केला आहे. काल हा सगळा प्रकार घडला असून या घटनेनंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मटका अड्डा उधळून लावला. महिला कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीच्या घरात घुसत मटका अड्डा बंद पाडला. एका घरात मटका सुरू असल्याची पोलिसाकडे तक्रार करून देखील त्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यामुळे मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आपण मटका अड्डा उधळून लावला असल्याचे म्हणणे आहे.

तासगाव शहरातील सोमवार पेठेत सुरू असलेला मटका अड्डा मनसेच्या तासगाव महिला आघाडीच्यावतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मटका घेणाऱ्या दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. संतोष अशोक राक्षे, प्रमोद प्रकाश मगदूम अशी त्यांची नावे आहेत. शहरात आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मटका सुरू असून तो बंद करावा, अशी मागणी मनसेच्या दीपाली पुडकर यांनी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आणि तासगाव उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

हे ही वाचा-ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क माफ

मात्र पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने मंगळवारी दुपारी पुडकर यांच्या समवेत अन्य सहा सात महिला आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यासह मटका अड्डयावर धडक दिली. त्यावेळी राक्षे व मगदूम हे मटकाबुकी बद्रुद्दीन तांबोळी याच्यासाठी मटका घेत होते. यावेळी आक्रमक होत महिलांनी अड्ड्यावरील कपाट व अन्य सामानाची तोडफोड केली. बराच काळ हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर मटक्याच्या चिठ्या महिलांनी गोळ्या केल्या. यावेळी मटका बुकी आणि महिलांमध्ये बराच काळ बाचाबाची झाली. त्यानंतर तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मटका बुकींना ताब्यात घेतले.

First published:

Tags: MNS