मुंबई 28 एप्रिल: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. सुरुवातीला 21 दिवस आणि नंतर आणखी त्यात वाढ करण्यात आली. 3 मे रोजी लॉकडाऊन संपणार आहे. पण कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच असल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढणार की सरकार काही सुट देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लॉकडाऊन हटवलं तर कोरोना प्रसाराचा धोका आणि कायम ठेवलं तर अर्थव्यवस्थेची दुरावस्था अशा दुहेरी कोंडीत सरकार सापडलं असून 3 मे नंतर काय धोरण असावं यासाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर कामाला लागलं आहे. सरकारने जे हॉटस्पॉट घोषीत केलेत त्या ठिकाणचे निर्बंध कायम ठेवून इतर ठिकाणी काही सुट मिळण्याची शक्यता आहे. उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार काही नियम शिथील करण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे आणि विमान वाहतूक लगेच सुरू करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी पोहोचता यावं यासाठी सरकार काही उपाय योजनांवर विचार करत आहे. तर लॉकडाऊ पुन्हा काही दिवसांसाठी वाढविण्यात यावा अशी मागणी 6 मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोनाविरोधात आशेचा किरण असलेल्या Plasma therapy बाबत ICMR चं मोठं स्पष्टीकरण देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. आता देशभर लॉकडाऊन आहे आणि विदेशातून होणारी हवाई वाहतूकही बंद आहे. पण देशांतर्गत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यांना भीती आहे ती कम्युनिटी लागण झाली का याची? मात्र आरोग्य मंत्रालयाने यावर मोठा खुलासा केला आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना याबाबतचा खुलासा केला. देशात अजुनही कम्युनिटी लागण झाल्याचे ठोस पुरावे नाहीत असं त्यांनी सांगितलं. कम्युनिटी लागण म्हणजे बाहेरून संक्रमण घेऊन आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात न येताही झालेलं संक्रमण असं म्हणता येईल. यात समाजातल्या विविध घटकांना त्यांची लागण होत असते आणि त्याचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. लॉकडाऊनमुळे देशात मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘कोरोना’विरुद्ध नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, असा आहे सरकारचा ‘मास्टर प्लान' देशात गेल्या 24 तासांमध्ये 1543 एवढे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 29,435 एवढी झालीय. तर रुग्ण बरे होण्याची प्रमाण वाढलं असून ते 23.3 टक्क्यांवर गेल्याची माहिती त्यांनी दिली. ही अत्यंत चांगली गोष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.