Home /News /mumbai /

BREAKING: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पुण्याहून अटक केलेल्या जुनैदच्या संपर्कात असलेल्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

BREAKING: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पुण्याहून अटक केलेल्या जुनैदच्या संपर्कात असलेल्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

Representative Image

Representative Image

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुनैद याच्या संपर्कात असलेल्या आणखी एका दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने एटक केली आहे.

पुणे, 2 जून : महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) एक मोठी कारवाई केली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुनैद याच्या संपर्कात असलेल्या एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या (terrorist arrest) आहेत. काश्मीरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच तो लष्कर ए-तोयबाचा दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र एटीएसने एका तरुणाला पुण्यातून (Pune) अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद जुनैद असं आहे. त्याला एटीएसच्या टीमने पुण्यातील दापोडी (Dapodi) येथून अटक केली होती. दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी तो काम करत होता. त्याच प्रकरणात आता एटीएसने काश्मीरमधून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्यासोबत जुनैद सातत्याने संपर्कात होता. जुनैदला 3 जूनपर्यंत एटीएस कोठडी जुनैद याला अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 3 जूनपर्यंत एटीएस कोठडी (ATS custody) सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने पुण्यातल्या दापोडीमध्ये कारवाई करत मोहम्मद जुनैद या 28 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याचा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या संघटनांशी थेट संबंध असल्याचं एटीएसच्या लक्षात आलं. त्याबाबतची माहिती दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला दिली होती आणि त्यानंतर जुनेद एटीएसच्या रडारवर आला होता. जुनैदवर नेमका काय आरोप? मोहम्मद जुनैद हा तरुण दोन वर्षात 6 वेळा काश्मीरला जाऊन आलाय. तो फेसबुकद्वारे दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. तो फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर सिमकार्ड बदलून सतत सक्रिय होता. त्याच्यावर नवीन लोकांची भरती करण्याची जबाबदारी होती. तो आणखी तीन जनांसोबत संपर्कात होता. तो शस्त्रास्त्र खरेदीसाठी फंडिंग गोळा करत होता. त्याने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी रेकी केलीय. त्याच्या खात्यावर दोन वेळा पाच-पाच हजार रुपये दहशतवादी संघटनांकडून पाठवण्यात आले. ते विड्रॉ करून त्याने वेगवेगळ्या कामासाठी वापरले. जुनैदला नेमकं कसं पकडलं? दहशतवादी विरोधी पथकाने जुनैदवर लक्ष केंद्रीत केल्यावर त्याच्या फेसबुक आणि WhatsApp chat वर लक्ष केंद्रीत केलं गेलं जिथे तो सातत्याने सिमकार्ड बदलून बोलत होता. प्लॅनिंगमध्ये त्याला पैसे जमा करण्यापासून नव्या तरुणांना रॅडिकलाईज करून भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसे 3 नवे लोक भरती करण्याची तयारी पूर्ण झाली होती. महाराष्ट्रातल्या खामगाव बुलढाण्याचा 28 वर्षाचा बेकार तरुण दहशतवादी संघटनांच्या नादाला लागल्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. इतकंच नाही तर इथेच आजूबाजूला राहून या कारवाया केल्या जात होत्या. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा आणि तपास यंत्रणा दोन्ही समोर मोठं आव्हान आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: ATS, Mumbai, Terrorist

पुढील बातम्या