Home /News /maharashtra /

पुण्यात राहून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात, ATSने मुसक्या आवळल्या, तरुणाची रवानगी कोठडीत

पुण्यात राहून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात, ATSने मुसक्या आवळल्या, तरुणाची रवानगी कोठडीत

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असल्याने दापोडी (Dapodi) परिसरातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पुणे, 24 मे : दहशतवादी विरोधी पथकाकडून (Maharashtra Anti-terrorist squad) पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असल्याने दापोडी (Dapodi) परिसरातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जुनेद मोहम्मद (Juned Mohmmad) असं 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 3 जूनपर्यंत एटीएस कोठडी (ATS custody) सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने पुण्यातल्या दापोडीमध्ये कारवाई करत मोहम्मद जुनेद या 28 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. त्याचा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या संघटनांशी थेट संबंध असल्याचं एटीएसच्या लक्षात आलं. त्याबाबतची माहिती दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला दिली होती आणि त्यानंतर जुनेद एटीएसच्या रडारवर आला. जुनेदवर नेमके आरोप काय? मोहम्मद जुनेद हा तरुण दोन वर्षात 6 वेळा काश्मीरला जाऊन आलाय. तो फेसबुकद्वारे दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. तो फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर सिमकार्ड बदलून सतत सक्रिय होता. त्याच्यावर नवीन लोकांची भरती करण्याची जबाबदारी होती. तो आणखी तीन जनांसोबत संपर्कात होता. तो शस्त्रास्त्र खरेदीसाठी फंडिंग गोळा करत होता. त्याने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी रेकी केलीय. त्याच्या खात्यावर दोन वेळा पाच-पाच हजार रुपये दहशतवादी संघटनांकडून पाठवण्यात आले. ते विड्रॉ करून त्याने वेगवेगळ्या कामासाठी वापरले. (महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, एकत्र लढणार?) जुनेदला नेमकं कसं पकडलं? दहशतवादी विरोधी पथकाने जुनेदवर लक्ष केंद्रीत केल्यावर त्याच्या फेसबुक आणि WhatsApp chat वर लक्ष केंद्रीत केलं गेलं जिथे तो सातत्याने सिमकार्ड बदलून बोलत होता. प्लॅनिंगमध्ये त्याला पैसे जमा करण्यापासून नव्या तरुणांना रॅडिकलाईज करून भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसे 3 नवे लोक भरती करण्याची तयारी पूर्ण झाली होती. महाराष्ट्रातल्या खामगाव बुलढाण्याचा 28 वर्षाचा बेकार तरुण दहशतवादी संघटनांच्या नादाला लागल्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. इतकंच नाही तर इथेच आजूबाजूला राहून या कारवाया केल्या जात होत्या. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा आणि तपास यंत्रणा दोन्ही समोर मोठं आव्हान आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: ATS, Pune, Pune ATS

पुढील बातम्या