मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्याशी संबंधित 1000 कोटींची संपत्ती जप्तीची नोटीस, आयकर विभागाची मोठी कारवाई

ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्याशी संबंधित 1000 कोटींची संपत्ती जप्तीची नोटीस, आयकर विभागाची मोठी कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

उपमुख्यमंत्री अजित पवार (फाईल फोटो)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

आशिष महर्षी, प्रतिनिधी

मुंबई, 2 नोव्हेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाकडून (Income Tax) बजावण्यात आली आहे. सीएनएन न्यूज 18 चे प्रतिनिधी आशिष महर्षी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 1000 कोटी रुपयांची ही संपत्ती आयकर विभागाकडून जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने ज्या संपत्ती जप्त करण्याच्या संदर्भात नोटीस बजावली आहे त्यामध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील मालमत्ता, मुंबईतील निर्मल इमारतीचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाकडून झाडाझडती करण्यात येत आहे. त्यानंतर आता आयकर विभागाने अजित पवारांच्या संबंधित मालमत्ता जप्तीची नोटीस काढली आहे.

कोणत्या संपत्ती जप्त करण्याचे आदेश

एक साखर कारखाना (किंमत - जवळपास 600 कोटी रुपये)

दक्षिण दिल्लीत एक फ्लॅट (किंमत - जवळपास 20 कोटी रुपये)

मुंबईतील एक कार्यालय (किंमत - जवळपास 25 कोटी रुपये)

गोव्यातील एक रिसॉर्ट (किंमत - जवळपास 250 कोटी रुपये)

राज्यातील 27 वेगवेगळ्या ठिकाणची जमीन (किंमत - जवळपास 500 कोटी रुपये)

महाराष्ट्र सरकारला दुसरा झटका 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने रात्री उशीरा अटक केली आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्याची नोटीस आयकर विभागाने काढली आहे. त्यामुळे दिवसभरात हा महाविकास आघाडी सरकारला बसलेला दुसरा झटका आहे.

चार दिवसांपूर्वी अजित पवारांचे नातेवाईकांच्या घरी ED कडून छापेमारी

28 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती करण्यात आली. जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला.

अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने (7 ऑक्टोबर 2021) छापेमारी (Income Tax Raid) केली. यासोबतच अजित पवार यांच्या बहिणींच्या घर, कार्यालयांवरही आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती.

बहिणींच्या कंपन्यांवर छापेमारी का? : अजित पवारांचा सवाल

अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्यांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी केली. यासोबत अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी आणि कोल्हापूर येथील बहिणीच्या कार्यालयावर छापेमारी केली. आयकर विभागाच्या या कारवाईनंतर अजित पवारांनी म्हटलं होतं, ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची 35-40 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या त्यांच्या-त्यांच्य़ा घरी अतिशय चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण मला समजू शकलेलं नाहीये.

यापूर्वी देशभरात विविध ठिकाणी आयटीकडून छापेमारी

आयकर विभागाने (Income Tax) गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत तब्बल 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. सीबीडीटी (CBDT)ने शुक्रवारी या संदर्भात माहिती देत म्हटलं, "7 ऑक्टोबर 2021 पासुन विविध ठिकाणी धाडसत्र करण्यात आलं. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), बारामती, गोवा आणि जयपूर येथे जवळपास 70 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली होती".

सीबीडीटीने काही दिवसांपूर्वी सांगितले की, दोन रिअल इस्टेट उद्योगांच्या कार्यालयावर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, संस्थांवर छापेमारी करण्यात आली. झाडाझडती दरम्यान बेहिशेबी आणि बेनामी आर्तिक व्यवहारांचा खुलासा झाला आहे. काही संशयास्पद व्यवहार, कागदपत्रे आढळून आले आहेत. तसेच या दोन्ही ग्रुप्सच्या जवळपास 184 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा झाला आहे.

First published:

Tags: Ajit pawar