मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

IT Raid: छापेमारीत तब्बल 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; मुंबई, पुणे, गोवा, जयपूरमध्ये झाली होती छापेमारी

IT Raid: छापेमारीत तब्बल 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; मुंबई, पुणे, गोवा, जयपूरमध्ये झाली होती छापेमारी

मोठी बातमी ! मुंबई, पुण्यातील आयकर विभागाच्या छापेमारीत तब्बल 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

मोठी बातमी ! मुंबई, पुण्यातील आयकर विभागाच्या छापेमारीत तब्बल 184 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

IT raid in Maharashtra: आयकर विभागाने गेल्या काही दिवसांत केलेल्या छापेमारीत तब्बल 184 कोटी रुपयांची बेहिशीबी मालमत्ता उघड झाली आहे.

    मुंबई, 16 ऑक्टोबर : आयकर विभागाने (Income Tax) गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत तब्बल 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. सीबीडीटी (CBDT)ने शुक्रवारी या संदर्भात माहिती देत म्हटलं, "7 ऑक्टोबर 2021 पासुन विविध ठिकाणी धाडसत्र करण्यात आलं. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), बारामती, गोवा आणि जयपूर येथे जवळपास 70 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली होती". सीबीडीटीने सांगितले की, दोन रिअल इस्टेट उद्योगांच्या कार्यालयावर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, संस्थांवर छापेमारी करण्यात आली. झाडाझडती दरम्यान बेहिशेबी आणि बेनामी आर्तिक व्यवहारांचा खुलासा झाला आहे. काही संशयास्पद व्यवहार, कागदपत्रे आढळून आले आहेत. तसेच या दोन्ही ग्रुप्सच्या जवळपास 184 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा झाला आहे. छापेमारी दरम्यान 2.13 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 4.32 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकऱणी अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. दोन्ही ग्रुप्सने केलेले व्यवहार संशयास्पद आढळून आले आहे असंही आयकर खात्याने म्हटलं आहे. बोगस शेअर प्रीमिअर, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी आगाऊ रक्कम, लवाद सौदे यासारख्या संशयास्पद मार्गाने ही बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची माहिती समोर येत आहे. संशयास्पद पद्धतीने जमवलेला हा पैसा मुंबईतील विविध ठिकाणी कार्यालय इमारत, गोव्यात रिसॉर्ट, महाराष्ट्रातील विविध भागांत शेतजमीन, साखर कारखान्यांत गुंतवणूक, दिल्लीत फ्लॅट घेण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वा संपत्तीची एकूण किंमत जवळपास 170 कोटी रुपयांच्या घरात आहे. वाचा : मुंबई, पुण्यासह 40 ठिकाणी आयकर विभागाचे छापे ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र गोव्यात 44 ठिकाणी छापे 25 ऑगस्ट 2021 रोजी आयकर विभागाने महाराष्ट्र आणि गोव्यात विविध ठिकाणी छापेमारी केली होती. एकूण 44 हून अधिक ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि गोवा येथील उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली होती. ज्या समुहावर ही कारवाई करण्यात आली होती तो समूह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोव्यातील एका नामांकित पोलाद उत्पादक आणि व्यापारी आहे. आयकर विभाकाने ही छापेमारी करुन अनेक महत्त्वाचे कागपत्रे, डिजिटल पुलावे जप्त केले होते. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांनतंर समोर आलेल्या पुराव्यामुळे हे उघड झाले की, हा समूह विविध बनावट पावत्या तयार करणाऱ्यांकडून भंगाराची आणि स्पंज आर्यनची खरेदी करण्याच्या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतला होता. या कारवाई दरम्यान बनावट पावत्या जारी करणाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. अशा पावत्या देणाऱ्यांनी कबूल केले आहे की, त्यांनी केवळ देयके पुरवली मात्र ज्याची देयके होती ते साहित्य पुरवलेले नाही. खरोखर खरेदी केल्याचे दाखविण्यासाठी आणि जीएसटी इनपुट क्रेडीटचा दावा करण्यासाठी बनावट ई-वे देयके देखील निर्माण करण्यात आली. पुण्याच्या जीएसटी प्राधिकरणाच्या सक्रीय पाठिंब्याने, बनावट ई-वे देयके ओळखण्यासाठी "व्हीईकल मुव्हमेंट ट्रॅकिंग अॅप" चा वार करण्यात आला होता. या समूहाने एकूण बनावट खरेदी, आतापर्यंत सुमारे 160 कोटी रुपयांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. आयकर विभागाने केलेल्या कारवाईत विविध ठिकाणांवरून 3 कोटी रुपयांची हेहिशेबी रोकड आणि 5.20 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले होते. यासोबतच 1.34 कोटी रुपयांचे 194 किलो चांदीच्या बेहिशेबी वस्तू सुद्धा या कारवाई दरम्यान सापडल्या होत्या.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Income tax, Mumbai, Pune

    पुढील बातम्या