Home /News /mumbai /

BEST मधील महिलांच्या आरक्षित सीटवर बसणाऱ्या पुरुषांना आता उठावच लागेल; घेतला मोठा निर्णय

BEST मधील महिलांच्या आरक्षित सीटवर बसणाऱ्या पुरुषांना आता उठावच लागेल; घेतला मोठा निर्णय

महिलांच्या आरक्षित जागेवर पुरुष मंडळी बसत असल्याच्या घडनांबाबत अनेक महिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

    मुंबई, 28 ऑगस्ट : बेस्ट बसमधील (BEST Bus) महिला प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरुन अनेकदा वाद झाल्यात आपण पाहिलं असेल. बेस्ट बसमधील जागा महिलांसाठी आरक्षित असतानाही अनेकदा पुरुषमंडळी या जागेवर आपला हक्का दाखवितात. अनेकदा तर सांगूनही या जागेवरुन उठत नाही. शेवटी याचं रुपांतर वादात होतं. आता मात्र याबाबत बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. (BEST has decided to impose a penalty on men if they sit on seats reserved for women in buses) मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टने परिवहन कंपनीकडून (transport company) चालविल्या जाणाऱ्या बसमध्ये महिलांच्या आरक्षित जागेवर बसणाऱ्या पुरुषांना यापुढे दंड भरावा लागणार आहे. याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय बेस्टकडून घेण्यात आला आहे. पुरुष प्रवाशाला यासाठी तब्बल 500 रुपयांचा दंड (pay a fine of Rs 500) भरावा लागेल. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचं प्रकरण आढळल्यास बसमधील कंडक्टर बस थेट पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची सूचना देतील आणि येथे पुरुष प्रवाशावर महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याअंतर्गंत दंड आकारला जाईल. हे ही वाचा-नरिमन पॉइंट, मंत्रालयासह 80 टक्के दक्षिण मुंबई जाईल पाण्याखाली; आयुक्तांचा इशारा महिलांच्या आरक्षित जागेवर पुरुष मंडळी बसत असल्याच्या घडनांबाबत अनेक महिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Best, Bus conductor, Mumbai

    पुढील बातम्या