मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नरिमन पॉइंट, मंत्रालयासह 80 टक्के दक्षिण मुंबई जाईल पाण्याखाली; आयुक्तांचा भयावह इशारा

नरिमन पॉइंट, मंत्रालयासह 80 टक्के दक्षिण मुंबई जाईल पाण्याखाली; आयुक्तांचा भयावह इशारा

Climate Change चा परिणाम मुंबईला जाणवू लागला आहे. समुद्राची पाणीपातळी वाढल्यामुळे 2050पर्यंत दक्षिण मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती आहे, असा इशारा खुद्द मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिला आहे.

Climate Change चा परिणाम मुंबईला जाणवू लागला आहे. समुद्राची पाणीपातळी वाढल्यामुळे 2050पर्यंत दक्षिण मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती आहे, असा इशारा खुद्द मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिला आहे.

Climate Change चा परिणाम मुंबईला जाणवू लागला आहे. समुद्राची पाणीपातळी वाढल्यामुळे 2050पर्यंत दक्षिण मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती आहे, असा इशारा खुद्द मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिला आहे.

मुंबई, 28 ऑगस्ट: मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Mumbai Commissioner Iqbal singh Chahal) यांनी मुंबई शहरासंदर्भात एक भयावह भविष्यवाणी केली आहे. नरिमन पॉइंट आणि मंत्रालय आदींसारख्या अत्यंच महत्त्वाच्या इमारती असलेल्या दक्षिण मुंबईचा एक मोठा भाग समुद्राची पाणीपातळी वाढल्यामुळे 2050पर्यंत पाण्याखाली जाण्याची भीती आहे, असं चहल म्हणाले. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते शुक्रवारी (27 ऑगस्ट) मुंबई हवामानबदल नियोजनासंदर्भातल्या वेबसाइटचं (https://mcap.mcgm.gov.in/) उद्घाटन झालं. त्या वेळी चहल बोलत होते. त्यांनी सांगितलं, की दक्षिण मुंबईतल्या ए, बी, सी आणि डी वॉर्डाचा 70 टक्के भाग हवामानबदलाच्या विपरीत परिणामांमुळे जलमय होऊन जाईल. 'हवामानबदलासाठी (Climate Change) स्वतःचं नियोजन तयार करून त्यावर काम करणारं मुंबई (Mumbai) हे दक्षिण आशियातलं पहिलं शहर आहे,' असंही चहल यांनी स्पष्ट केलं. चहल म्हणाले, 'निसर्ग आपल्याला संकेत देतो आहे; मात्र आपण जागे झालो नाही, तर भयानक परिस्थिती येऊ शकते. कफ परेड (Cuff Parade), नरिमन पॉइंट (Nariman Point), मंत्रालय आदी 80 टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतात. ही येत्या 25-30 वर्षांतली गोष्ट आहे. कारण 2050 फारसं दूर नाही. निसर्गाकडून मिळणारे संकेत ओळखून आपण योग्य पावलं उचलली नाहीत, तर दुष्परिणाम पुढच्या पिढीला नव्हे, तर आताच्या पिढीलाही भोगावे लागतील. गेल्या वर्षी निसर्ग (Nisarg) चक्रीवादळाचा मुंबईच्या किनाऱ्याला फटका बसला. मुंबईच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ येण्याची ही 129 वर्षांतली पहिलीच वेळ होती. त्यानंतर गेल्या 15 महिन्यांत तीन चक्रीवादळं आली. पाच ऑगस्ट 2020 रोजी नरिमन पॉइंटला तब्बल पाच-साडेपाच फूट उंचीपर्यंत पाणी साचलं होतं.' ते म्हणाले, 'त्या दिवशी चक्रीवादळाचा कोणताही इशारा देण्यात आला नव्हता; मात्र एकंदरीत पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि निकष पाहिले, तर ते चक्रीवादळाप्रमाणेच होतं.' पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस; मुंबईत कधी लागणार हजेरी? या परिस्थितीवर भर देऊन त्यांनी सांगितलं, 'मुंबई शहराने अलीकडच्या काही दिवसांत प्रचंड प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला आहे. यंदा मुंबईत तौते चक्रीवादळ आलं आणि 17 मे रोजी 214 मिलिमीटर पाऊस झाला. मान्सून इथे सात जूनला येतो.' तिसऱ्या लाटेआधी पालकांसाठी धोक्याची घंटा! 25 दिवसांत राज्यात 4500 मुलांना कोरोना बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे, की मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (Mumbai Climate Action Plan - MCAP) या योजनेअंतर्गत हवामानाच्या वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आकडेवारीच्या विश्लेषणाच्या आधारे सर्वांत असुरक्षित विभाग आणि समूह ओळखण्यात आले आहेत.
First published:

Tags: Climate change, Mumbai

पुढील बातम्या