जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 11 मिनिटं, 7 बॉम्बस्फोट अन् 189 बळी; मुंबईतील मन हेलावून टाकणाऱ्या काळ्या घटनेला 15 वर्ष पूर्ण

11 मिनिटं, 7 बॉम्बस्फोट अन् 189 बळी; मुंबईतील मन हेलावून टाकणाऱ्या काळ्या घटनेला 15 वर्ष पूर्ण

11 मिनिटं, 7 बॉम्बस्फोट अन् 189 बळी; मुंबईतील मन हेलावून टाकणाऱ्या काळ्या घटनेला 15 वर्ष पूर्ण

Mumbai Local Train Bomb Blast: लोकल ट्रेनमध्ये 11 मिनिटांत 7 बॉम्बस्फोट घडवून मुंबईला हादरवून सोडणाऱ्या काळ्या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै: आजच्याच दिवशी 2006 साली मुंबईत 11 मिनिटांत तब्बल 7 ठिकाणी भयानक विस्फोट (Bomb Blast) झाले होते. या दुर्दैवी घटनेत तब्बल 189 जणांचा हकनाक बळी (189 casualties) गेला होता. तर 800 हून अधिक जण या बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाले होते. या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहेत. पण अनेकांना या काळ्या दिवसाच्या आठवणी पुसता येत नाहीत. या घटनेत अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना कायमचं गमावलं होतं. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेला आज 15 वर्षे पूर्ण झाले आहेत. नेमकं काय घडलं त्यादिवशी? 11 जुलै, 2006 चा दिवस होता, सायंकाळचे 4 वाजून 35 मिनिटे झाली होती. मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकलनं हजारो लोकं प्रवास करत होते. दिवसभर काम करून थकलेले चेहरे घराच्या दिशेनं परतत होते. तर घरात आपली जीवाभावाची माणसं कामावरून घरी परत येणार म्हणून अनेकजण खूश होते. पण 11 जुलै 2006 च्या सायंकाळी केवळ 11 मिनिटांत संपूर्ण मुंबई हादरली होती. मुंबई आणि ठाणेदरम्यान लोकलमध्ये सात ठिकाणी भयानक विस्फोट झाले होते. हेही वाचा- #BREAKING: मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, गोवा हायकोर्टाचा निकाल माटुंगा रोड, माहिम, बांद्रा, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली आणि मीरा रोड याठिकाणी बॉम्बस्फोटचा भयानक नजारा घडला होता. या दुर्दैवी घटनेच तब्बल 189 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता. तर 800 हून अधिक लोकं यामध्ये गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा ही आतंकवादी संघटना असल्याचं तपासात उघड झालं होतं. याप्रकरणी विशेष न्यायालयानं सप्टेंबर 2015 मध्ये 12 जणांना शिक्षा सुनावली आहे. हेही वाचा- झवेरी बाझारात घडवला होता बॉम्बस्फोट, 27 वर्षांनंतर दहशतवादी मुसाला मुंबईतून अटक या साखळी बॉम्बस्फोटासाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्बचा वापर केला होता. दहशतवाद्यांनी हा कुकर बॉम्ब आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांचा वापर करून बनवला होता. संबंधित सात प्रेशर कुकर टायमर द्वारे उडवले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात