मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

स्टार्टअपसाठी जगातील सर्वोत्तम शहरांत मुंबईची कमाल; 1000 शहरांच्या यादीत औरंगाबादचाही डंका, जाणून घ्या स्थान

स्टार्टअपसाठी जगातील सर्वोत्तम शहरांत मुंबईची कमाल; 1000 शहरांच्या यादीत औरंगाबादचाही डंका, जाणून घ्या स्थान

स्टार्टअप ब्लिंक (Startup Blink Website survey) नावाच्या वेब साइटनं जगातील सर्वोत्तम 1000 शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील 43 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 02 जुलै: एखादा व्यवसाय सुरू करायचा (Startup) असेल तर कोणत्या शहरातून सुरुवात करावी, असा प्रश्न अनेक नवोदीत उद्योजकांना पडत असतो. व्यवसायाच्या भरभराटीसाठी संबंधित शहरातील एकंदरित वातावरण (City environment) कसं आहे? हे खूप महत्त्वाचं ठरतं. हाच प्रश्न केंद्रस्थानी ठेवत स्टार्टअप ब्लिंक (Startup Blink Website survey) नावाच्या वेब साइटनं जगातील सर्वोत्तम  1000 शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील 43 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश करण्यात आला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरानं या यादीत पहिल्या काही शहरांत आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

मुंबईनं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगली प्रगती केल्याचं दिसून आलं आहे. मागील वर्षी मुंबई या यादीत 20 व्या स्थानावर होती. पण यावर्षी मुंबईनं चार स्थानांनी झेप घेत 16 व्या क्रमांकांवर स्थानापन्न झाली आहे. यासोबत महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरानं देखील आपल्या नावाचा जगभर डंका वाजवला आहे. औरंगाबाद शहरानं 36 व्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

हेही वाचा-औरंगाबादमध्ये शिक्षकांनी सुरू केली अंकुर बँक चळवळ; पाहा काय आहे ही बँक

यादीत नव्यानं सामील झालेल्या शहरांमध्ये विशाखापट्टणम, विजयवाडा, रायपूर, पाटणा, वाराणसी, जमशेदपूर, औरंगाबाद, उडुपी आदी शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत बंगळुरू शहर 10व्या क्रमांकावर असून 14 व्या क्रमांकावर नवी दिल्ली आहे. तर मुंबईत 16 व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा-घरकाम करणाऱ्या आईची Inspiring कहाणी! मुलीला लॅपटॉप घेण्यासाठी जमवले 35000

ही यादी जाहीर करण्यापूर्वी स्टार्टअप ब्लिंक या वेबसाइटनं 3 निकषांचा आधार घेतला आहे. मात्रा, गुणवत्ता आणि व्यवसायासाठीचं वातावरण हे निकष तपासून शहरांची क्रमवारी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे जगातील स्टार्टअपसाठी सर्वोत्तम असणाऱ्या पहिल्या 1000 शहारांमध्ये भारतातील 43 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. मागच्या काही काळापासून देशातील औद्योगिक क्षेत्र झपाट्यानं वाढत आहे. अनेक नवनवीन शहरं औद्योगिक हब बनत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उद्योगस्नेही बनताना दिसत आहे.

First published:

Tags: Aurangabad, Mumbai