जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / अनोखी अंकुर बँक... नष्ट होत असलेल्या जंगली झाडांना नवसंजीवनी देण्याचा शिक्षकांचा प्रयत्न

अनोखी अंकुर बँक... नष्ट होत असलेल्या जंगली झाडांना नवसंजीवनी देण्याचा शिक्षकांचा प्रयत्न

अनोखी अंकुर बँक... नष्ट होत असलेल्या जंगली झाडांना नवसंजीवनी देण्याचा शिक्षकांचा प्रयत्न

वृक्षतोड, वनव्यांमुळे मराठवाड्यात दुर्मिळ असणाऱ्या काही वनस्पती कायमच्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची संख्या वाढवण्यासाठी औरंगाबादचे शिक्षक आणि वनस्पती अभ्यासक मिलींद गिरधारी यांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 16 जून: राज्यासह मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जंगली झाड (Trees) नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही विदेशी झाडांनी आपल्या डोंगरावर आक्रमण केल्याने देशी पारंपरिक झाडं नाहीशी होत आहेत. समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या झाडांची अंकुर बँक (Ankur Bank) औरंगाबादमध्ये तयार केली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या वृक्ष प्रेमी मिलिंद गिरीधारी यांनी ही बँक तयार केली आहे. फक्त स्वतःच्या खिश्यातून पैसे देणाऱ्या सामान्य नागरिकांना सोबत घेऊन ही अंकुर बँक चळवळ (Ankur Bank Movement) उभी करायचा मनोदय या शिक्षकांचा आहे. वृक्षतोड, वनव्यांमुळे मराठवाड्यात दुर्मिळ असणाऱ्या काही वनस्पती कायमच्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची संख्या वाढवण्यासाठी औरंगाबादचे शिक्षक आणि वनस्पती अभ्यासक मिलींद गिरधारी यांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभर फिरत त्यांच्या टीमने वनस्पतीच्या बिया गोळा करून त्यांची रोपे लावली. बघता बघता त्यांच्याकडे ‘दुर्मिळ वनस्पतींच्या रोपांची बँक’ तयार झाली. मराठवाड्यातला हा पहिलाच प्रयोग असून यामुळे पर्यावरणाचा समतोलही  राखला जाईल. इम्तियाज जलील यांच्या मुलाचं, ‘वाह मोदीजी वाह’, औरंगाबादेत रंगली एकच चर्चा पश्चिम घाटात आढळणारे मोखा, कौशी, पाडळ, हुंब, सफेद कुडा, तांबडा कुडा, काकड, कारवी, सोनसावर, निर्मळी, बिजा, कुचला, डिकेमाली, तिवस, मोई ही दुर्मिळ होत चाललेली वनस्पती. यापैकी काही औरंगाबाद, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील जंगलात आढळते. मात्र, त्यांची संख्या कमी आहे. वृक्षतोड, औषधीसाठी अतीवापर आणि दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांमुळे ही वनस्पती धोक्यात आली आहे. आताच लक्ष नाही दिले  तरी ती कायमची नष्ट हाेण्याचा धोका असल्याचे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या चारठा येथील शाळेतील शिक्षक मिलींद गिरधारी यांच्या लक्षात आली. गिरधारी यांनी त्यांचे पर्यावरणप्रेमी मित्र रोहित ठाकूर, त्यांची रोपटे तयार करण्याचा संकल्प केला. त्यापूर्वी त्यांनी मराठवाड्याच्या जंगलात केलेल्या पाहणीत पाडळ, कौशी, मोखा आणि बिजा ही झाडे  दुर्मिळ झाल्याचे आढळलेे.  भटकंती दरम्यान पाडळचे 1, हुंब 1, सफेद कुडा 2, कौशी 5 तर बिजाची केवळ 10 झाडे आढळून आली. त्यांचे संवर्धन नाही झाले तर ती कायमची नष्ट होतील. रोपटे लावण्यासाठी बियांची गरज होती. गिरधारी यांनी एप्रिल-मे च्या दरम्यान वनस्पतीच्या हजारो बिया गोळा केल्या. वनक्षेत्रात बिया जमा करण्यास बंदी आहे. पण, पाडळ, मोखा आणि कौशीच्या बिया विदर्भ व कोकणात काही शेतकऱ्यांच्या शेतात असल्याचे समजले गिरीधारी आणि मित्र कंपनीने स्वाखर्चातून बिया गोळा केल्या. आज हा प्रयोग छोटासा वाटला तरी अत्यंत महत्वाचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात