जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट संपाचा धोका, राज्यातून 1000 बसेस मुंबईत आणणार

कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट संपाचा धोका, राज्यातून 1000 बसेस मुंबईत आणणार

शिवसेनेचा अर्थसंकल्पातला वाटा 73 टक्के, भाजपचा 13 टक्के आहे. व्हीसीद्वारे फक्त स्वत:च्या सदस्यांना बोलू दिलं व त्यांच्यासमोर अर्थसंकल्प मंजूर केला. दुसरीकडे बेस्टची भरमसाठ बिलवाढ हा देखील मुद्दा त्यांच्या अविश्वास ठरावात नमूद करण्यात आला आहे.

शिवसेनेचा अर्थसंकल्पातला वाटा 73 टक्के, भाजपचा 13 टक्के आहे. व्हीसीद्वारे फक्त स्वत:च्या सदस्यांना बोलू दिलं व त्यांच्यासमोर अर्थसंकल्प मंजूर केला. दुसरीकडे बेस्टची भरमसाठ बिलवाढ हा देखील मुद्दा त्यांच्या अविश्वास ठरावात नमूद करण्यात आला आहे.

जर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप केला तर आरोग्य व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 16 मे : मुंबईत कोरोनाचा उद्रेक असतानाच बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालीय तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या अन्यथा संप करू असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातून तब्बल 1000 बसेस मुंबईत मागविण्यात आल्या आहेत. जर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप केला तर आरोग्य व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक बाबींवर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. सोमवार पासून संप करण्याची बेस्ट वर्कर्स युनियनची हाक दिलीय तर संप मोडून काढण्याच्या पवित्र्यात सरकार असून त्यांनी तशी तयारीही केली आहे. राज्याची राजधानी असलेली मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपल्यानंतरही मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये या व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मात्र अशा स्थितीतच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईकरांना धीर देत एक आवाहन केलं आहे. वाईनमुळे सुखावणार महाराष्ट्रातला शेतकरी, सरकारने घेतला मोठा निर्णय ‘मुंबईकराना विनंती आहे की आपण एवढी दिवस मेहनत घेतली आहे. आता आणखी काही दिवस घरी राहा. हा लढा अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला नक्की यश मिळेल,’ असं सांगत इकबाल चहल यांनी मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. Lockdown मध्ये रुग्णालयाने डॉक्टरला काढून टाकलं, निषेधार्थ सुरू केला चहाचा गाडा महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी आज सायन रुग्णालयाची पाहणी केली. ‘हे रुग्णालय आमच्यासाठी महत्वाचं आहे. येथील आयसीयू , कोव्हिड वॉर्डचीही त्यांनी केली. तसंच यावेळी चहल यांनी थेट रुग्ण, आरोग्य सेवक यांच्या अडचणी जाणून घेत धीर दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात