मुंबई, 25 सप्टेंबर: मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरस (Corona Virus) बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. शहरात लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मुंबई शहरानंही लसीकरणात (Corona Vaccination) विक्रम केला आहे. लसीकरणात मुंबईनं एक कोटीचा टप्पा गाठला आहे. मुंबई पालिकेकडून (BMC) वेगवेगळ्या स्तरावर लसीकरण सुरु केलं आहे. पालिकेनं सुरु केलेल्या मोहिमेत आतापर्यंत 45 ते 59 वयोगटातील नागरिक आघाडीवर आहे.
45 ते 59 या वयोगटातील 90 टक्के नागरिकांनी पहिला तर 59 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहे. त्यामुळे हे नागरिक पूर्णपणे सुरक्षित झालेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांचं कोविडविरुद्ध 40 टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. 85 टक्के नागरिकांना किमान पहिला डोस मिळाला असल्याचं पालिकेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे.
हेही वाचा- Horrible Accident; परीक्षा द्यायला जाणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला, 6 ठार
45 ते 59 वयोगटातील नागरिकांचं सर्वाधिक आणि पूर्ण लसीकरण झालं आहे. त्याची टक्केवारी 59 टक्के इतकी आहे. त्यानंतर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वयोगटाचा क्रमांक लागतो. 55 टक्के 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
UNGA मध्ये पाकिस्तानला 'करारा जबाब' देणाऱ्या कोण आहेत स्नेहा दुबे?
मुंबईतील 18 ते 45 वयोगटातील 23 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी 20 टक्के नागरिक मुंबई महानगर प्रदेशातील आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus cases, Mumbai