Home /News /mumbai /

बहुमत चाचणीआधी शिवसेनेला मोठा धक्का, सेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

बहुमत चाचणीआधी शिवसेनेला मोठा धक्का, सेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात सामील

संतोष बांगर आज ताज प्रेसिडन्सीमध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळाले. संतोष बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या.

    मुंबई, 4 जुलै : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेला (Shivsena) बहुमत चाचणीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर हे काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी काल शिवसेनेच्या बाजून मतदान सुद्धा केलं होतं. मात्र आज त्यांनी बदलेल्या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. संतोष बांगर आज ताज प्रेसिडन्सीमध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळाले. संतोष बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यानंतर संतोष बांगर हे शिंदे गटातील आमदारांसोबत बस मधून विधानभवनात रवाना झाले आहे. संतोष बांगर यांच्या बंडखोरीमुळे आता शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. तर शिवसेने सोबतच्या आमदारांची संख्या आता 15 वर आली आहे. ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित, संजय पांडेंना ईडीचे समन्स TOP बातम्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार ज्यावेळी गुवाहाटी येथे पोहोचले होते, तेव्हा आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक दिसले होत. त्यांनी या बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन देखील केले होते. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी दाखवलं होतं. मात्र ते अचानक शिंदे गटात सामील झाल्याने आणखी किती आमदार शिंदे गटात सामील होणार असा प्रश्न उपस्थित होतो. एकनाथ शिंदे पुन्हा जिंकले; ठाकरेंना जबर धक्का; शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाबाबत मोठा निर्णय आज शिंदे सरकारची फ्लोअर टेस्ट शिवसेनेचे एकनाथ शिंदे  यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर टेस्ट होणार आहे. विधानसभेच्या फ्लोअर टेस्टपूर्वी (Floor Test) रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या कोट्यातील सर्व आमदारही सहभागी होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Shivseana, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या