मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात स्वातंत्र्यदिनी तीन जिल्ह्यात आत्मदहनाचा प्रयत्न, वाचा सविस्तर बातमी; Watch Video

राज्यात स्वातंत्र्यदिनी तीन जिल्ह्यात आत्मदहनाचा प्रयत्न, वाचा सविस्तर बातमी; Watch Video

संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. मात्र राज्यात तीन धक्कादायक घटना घडल्या आहेत. आज राज्यातल्या तीन जिल्ह्यांमध्ये तीन आत्मदहनाच्या (Commit Suicide) घटना घडल्याचं समोर आलं आहे.

संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. मात्र राज्यात तीन धक्कादायक घटना घडल्या आहेत. आज राज्यातल्या तीन जिल्ह्यांमध्ये तीन आत्मदहनाच्या (Commit Suicide) घटना घडल्याचं समोर आलं आहे.

संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. मात्र राज्यात तीन धक्कादायक घटना घडल्या आहेत. आज राज्यातल्या तीन जिल्ह्यांमध्ये तीन आत्मदहनाच्या (Commit Suicide) घटना घडल्याचं समोर आलं आहे.

    मुंबई, 15 ऑगस्ट: आज देशाचा 75 वा (Independence Day) स्वातंत्र्यदिन. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. मात्र राज्यात तीन धक्कादायक घटना घडल्या आहेत. आज राज्यातल्या तीन जिल्ह्यांमध्ये तीन आत्मदहनाच्या (Commit Suicide) घटना घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील मंत्रालयाबाहेर (Mantralaya) शेतकऱ्यानं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरी घटना साताऱ्यातील (Satara) आसरे गावातील सात जणांनी जमीन हडपल्याचा कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तिसरी घटना तुळजापूर (Tuljapur) शहरात घडली आहे. आता या तिन्ही घटना सविस्तर वाचूया मुंबईतल्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न मंत्रालयासमोर (Mantralaya) जळगावच्या शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) आज मुंबईत (Mumbai) मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या (Cm Uddhav Thackeray) हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या परिसरात जळगावच्या शेतकऱ्याने (Commit Suicide Jalgaon Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. सध्या या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सुनील गुजर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. संबंधित शेतकऱ्याला मंत्रालय पोलीस आणि मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेतीत मोठं नुकसान झालं आहे. घर गहाण पडलं आहे. मोठी आर्थिक चणचण आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. साताऱ्यातील आसरे गावात दुसरी घटना स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सातारा जिल्हाधिकारी परिसर वेगवेगळ्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. कोरेगाव तालुक्यातील आसरे गावातील सात जणांनी जमीन बळकावल्याचा आरोप करत आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 2018 मध्ये आसरे गावातीलच एका प्रतिष्ठित व्यक्तीने ही जमीन हडपण्याचा आरोप आत्मदहन करत यांनी केला असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने हे आत्मदहन करीत असल्याचं आत्मदहन कर्त्यांनी सांगितले यावेळी पोलिसांनी तात्काळ सात जणांना ताब्यात घेतले. तिसरी घटना तुळजापूर शहरात तुळजापूर शहरातील प्रतीक्षा पुणेकर या 18 वर्षीय मुलीचा शहरातीलच कुतवळ हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. डॉक्टरनं केलेल्या चुकीच्या उपचारामुळे आणि हलगर्जीपणा मुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. मुलीच्या कुटुंबियांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडताच आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबातील सर्वांना ताब्यात घेतले आहे. मुलीचे वडील प्रकाश पुणेकर आणि आई संजीवनी पुणेकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. वेताळ नगर भागात राहणारे प्रकाश पुणेकर आणि संजीवनी पुणेकर यांची एकुलती एक मुलगी प्रतीक्षा पुणेकर हिला उलटी होऊन पोटात दुखू लागलं. त्यामुळे तिला शहरातील कुतवळ हॉस्पिटलमध्ये 4 फेब्रुवारी 2020 मध्ये दाखल करण्यात आलं होतं. चार दिवस कुतवळ हॉस्पिटलमध्ये मुलीला ठेवण्यात आले आणि त्यानंतर 8 फेब्रुवारी 2020 ला पहाटे अचानक मुलीला सोलापूरला नेण्यास डॉक्टरांनी सांगितले. दुर्दैवाने त्याच दिवशी मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉ. दिग्विजय कुतवळ यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी देऊनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्याने मुलीच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai, Satara, Solapur, Suicide attempt

    पुढील बातम्या