मुंबई, 18 मार्च : सध्या देशभरात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. देशाच्या विविध भागात त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता धीरेंद्र शास्त्री यांना मुंबईतून आमंत्रण मिळालं आहे. मात्र, या कार्यक्रमाला अंनिसने कडाडून विरोध केला आहे. पोलिसांनीही आयोजकांनी नोटीस बजावली आहे.
धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम मुंबई जवळील मीरा रोड परिसरात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आज आणि उद्या होत आहे. त्यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती खुद्द बागेश्वर धामच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या या कार्यक्रमाला अंनिसने आक्षेप घेतला आहे. मीरारोड पोलीस स्थानकात अंनिसने तक्रार दिली आहे. या तक्रारीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम होत असल्याची तक्रार अंनिसने मीरारोड पोलिसांकडे केली.
(Bageshwar Maharaj : कोण आहेत बागेश्वर महाराज? धीरूचा पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री कसे झाले?)
तर दुसरीकडे काँग्रेसनंही बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहबे. पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या या कार्यक्रमाविरोधात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात विरोध केला जात आहे.
पोलिसांनी आयोजकांना बजावली नोटीस
तर, बाबा बागेश्वर यांच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांनी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. CRPC 149 नुसार ही नोटीस पाठवली आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान काही गोंधळ झाला तर पोलीस कारवाई करेल, असं या नोटीशीत सांगण्यात आलं.
अंनिसचा विरोध का?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मीरा रोड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेळी पोलिसांनी कारवाई न केल्यास समिती उच्च न्यायालयात जाणार आहे.
(वडील होते पुजारी, कथित चमत्कारांमुळे चर्चेत आलेले धीरेंद्र शास्री आहेत तरी कोण?)
'आम्ही बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल मीरा रोड पोलिस ठाण्यात जादूटोणा अंतर्गत तक्रार दाखल केली आहे, आम्ही तक्रार दाखल करण्याची कायद्याची मागणी केली आहे कारण 7 आणि 8 जानेवारी रोजी त्यांचे दिव्य न्यायालय भरले होते, त्याचा व्हिडिओ YouTube वर अपलोड केले आहे' असं श्याम मानव म्हणाले.
त्याने वारंवार कायद्याचे उल्लंघन केल्याचे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे, त्यानंतर 18-19 रोजी मीरा रोड, मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्या संदर्भात पुन्हा कायद्याचे उल्लंघन केले जाईल, जर त्याल थांबवू दिले तर कायद्याचाा वारंवार उल्लंघन केला जात आहे, मग त्या कायद्याचे उल्लंघन होऊ नये ही जबाबदारी कार्यक्रम आयोजकांची आहे, असंही श्याम मानव म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.