जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Bageshwar Maharaj : कोण आहेत बागेश्वर महाराज? धीरूचा पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री कसे झाले?

Bageshwar Maharaj : कोण आहेत बागेश्वर महाराज? धीरूचा पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री कसे झाले?

कोण आहेत बागेश्वर महाराज?

कोण आहेत बागेश्वर महाराज?

Bageshwar Dham : बागेश्वर धामचे महाराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संताचा जन्म 1996 मध्ये छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

छतरपूर, 21 जानेवारी : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या वादात सापडले आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात यांच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिल्याने हा वाद चिघळला. ते महाराष्ट्रातून पळून गेले असा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत एका रात्रीत एक तरुण कथाकार इतका प्रसिद्ध कसा झाला? बुंदेलखंडच्या या तरुण कथाकाराचा किंवा बागेश्वर धामच्या महाराजांचा धीरू ते पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री असा प्रवास कसा होता? बागेश्वर धामचे महाराज म्हटल्या जाणार्‍या या संताचा जन्म 1996 मध्ये छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात झाला होता, असे सांगितले जाते. हे दोघे भाऊ एक बहिण. भाऊ लहान आहे, त्याचे नाव सालिग राम गर्ग उर्फ ​​सौरभ आहे. बहिणीचे नाव रीटा गर्ग. वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज आहे. असे म्हणतात की आई सरोज महाराजांना घरात प्रेमाने धीरू म्हणतात आणि गावातील लोक त्यांना धीरेंद्र गर्ग म्हणतात. असा प्रवास सुरू झाला धीरेंद्र गर्ग लहानपणापासूनच चंचल, हुशार आणि जिद्दी होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. त्यांनी गावाजवळील गंज गावातून हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतले आहे. धीरेंद्र गर्ग यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला असून त्यांचे वडील गावात पुजारी म्हणून काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. एक वेळ अशी आली की त्याच्या कुटुंबातील काका वगैरेंनी गावात राहणाऱ्या कुटुंबांना पुजारीपदासाठी आपसात वाटून घेतले. वाटणीनंतर महाराजांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यांची आई सरोज यांनी म्हशीचे दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. इकडे बागेश्वर धामचे महाराज काहीतरी करण्याच्या तयारीत होते. गावातील लोकांमध्ये बसून त्यांनी कथा कथन सुरू केले आणि हळूहळू कथांमध्ये ते इतके प्रवणी झाले की 2009 मध्ये त्यांनी पहिली भागवत कथा जवळच्या पहारा येथील खुदान गावात सांगितली. हे करत असताना त्यांची आजूबाजूला ओळख झाली आणि लोक त्यांच्या गावातील भागवत कथा कार्यक्रमात त्यांना ऐकू लागले. वाचा - काळी जादू, अघोरी कामांसाठी ही 5 ठिकाणं कुप्रसिद्ध; तेथे मुगल आणि इंग्रजही जायला घाबरायचे धीरूपासून पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर महाराज कसे झाले? असे म्हणतात की पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यात लहानपणापासूनच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता होती. काहीतरी नवीन करण्याची हिंमत त्याच्यात नेहमीच असायची. म्हणूनच त्यांनी त्यांच्या गढा गावात असलेले शंकरजींचे प्राचीन मंदिर हे त्यांचे स्थान म्हणून निवडले. या मंदिरात शंकराचे ज्योतिर्लिंग आहे. जे बागेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. 2016 मध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे मोठा यज्ञ आयोजित करण्यात आला होता. त्यात श्री बालाजी महाराजांच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेव्हापासून हे ठिकाण बागेश्वर धाम म्हणून ओळखले जाऊ लागले. लोक इथे येऊ लागले. भागवत कथाकार श्री बालाजी महाराजांच्या मंदिराच्या मागे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आजोबा सेतुलाल गर्ग संन्यासी बाबा यांची समाधी असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी धीरेंद्र गर्ग यांनी अनेकवेळा भागवत कथेचे आयोजन केले. आजूबाजूच्या परिसरासह जिल्ह्यातील सर्व धर्मप्रेमींना बोलावू लागले. जेव्हा त्यांनी आपल्या धार्मिक ज्ञानाने, शक्तींनी आणि कथेच्या शैलीने लोकांना जोडण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचे भक्त वाढू लागले. बागेश्वरच्या या मंदिराला बागेश्वर धाम होण्यास वेळ लागला नाही. धीरूचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणण्याचा प्रवास इथून सुरू झाला. बागेश्वर धामच्या महाराजांनी आपला आभास अशा प्रकारे दाखवला की हजारो लोक दर्शन घेण्यासाठी येथे पोहोचू लागले.

कागदावर लिहतात भक्तांचे दुःख महाराजांनी बागेश्वर धाममध्ये असा दरबार आयोजित केला की जगभरातून लोक आपले दुःख घेऊन त्यांच्या दरबारात पोहोचू लागले. दरबारातील महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पीडितेचे विचार एका कागदावर आधीच लिहून ठेवतात, असे लोक सांगतात. ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. पूर्वी महाराज एकट्या बागेश्वर धाममध्ये दरबार चालवत असत, पण आता ते देशासह विदेशातही दरबार भरवून लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. वाचा - मौनी अमावस्येला आज करा या एका स्तोत्राचा पाठ; घरावरील पितृदोष जाईल निघून महाराजांच्या दरबारात काय होतं? उपस्थितांमधल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांना मंचावर बोलवायचं. त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहून दाखवायचं आणि त्या समस्येवर उपायही सांगायचा. हे महाराज लोकांच्या अंगातली भुतंही उतरवतात, असा दावा केला जातो. मध्येच मंचावरुन उतरायचं आणि अंगात संचारलेल्या लोकांपर्यंत जायचं आणि त्यानंतर भूतबाधा झालेल्यांना मंचापर्यंत बोलवायचं, अशी त्यांची पद्धत. बागेश्वर उर्फ धीरेंद्र महाराज जे दावे करतात, तो चमत्कार नसून समाजसेवा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. जेव्हापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर महाराजांना चॅलेन्ज केलं, तेव्हापासून तर त्यांच्या दरबारात मीडियाचीही गर्दी झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सनातन धर्माचे अनुयायी धीरू आता पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर धामचे महाराज झाले असून त्यांचे लाखो भक्त आहेत. ते सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी धर्मप्रेमींना नेहमीच प्रेरित करतात. बागेश्वर धामच्या महाराजांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, आता ते त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. महाराज त्यांच्या कथा आणि विधानांमध्ये बुंदेली भाषेचा वापर करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात