मुंबईत पोलिसांवर कोयत्याने हल्ला, 4 पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकारी गंभीर जखमी

मुंबईत पोलिसांवर कोयत्याने हल्ला, 4 पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकारी गंभीर जखमी

मुंबईत अँटॉप हिल परिसरात गर्दी करू नका, आपापल्या घरी जा! असं सांगत रुट मार्ग काढणाऱ्या पोलिसांवरच कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मे: मुंबईत अँटॉप हिल परिसरात गर्दी करू नका, आपापल्या घरी जा! असं सांगत रुट मार्ग काढणाऱ्या पोलिसांवरच कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात चार पोलिस कर्मचाऱ्यांसह उपपोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एसआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश आहे. जखमीवर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा..सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरात घुसला कोरोना, केलं सेल्फ क्वारंटाइन

लॉकडाऊनदरम्यान पोलिसांनी गुरुवारी अँटॉप हिल परिसरात रुट मार्ग काढला होता. पोलिस कोकणी आगारात आले असता त्यांनी चौकांत उभ्या असलेल्या तरुणांच्या घोळक्याला हटकलं. मात्र, तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. नंतर तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. एवढंच नाही तर काही माथेफिरु तरुणांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचाऱ्यांसह उपपोलिस निरीक्षक चंद्रकांत बुद्धे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

कोकणी आगार परिसरात ही घटना घडली. पोलिसांवर 10 ते 15 जणांकडून हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांमध्ये 5 ते 6 महिलांचा समावेश आहे. सर्व 17 आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिस दलात कोरोनाची दहशत

दुसरीकडे, कोरोनाविरुद्ध कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलिस यांनाही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पोलिस दलात कोरोनामुळे सहावा बळी गुरुवारी गेला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक भगवान पार्टे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. 45 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा..24 तासांत कोरोनाचं केंद्र झाली मुंबई! प्रत्येक तासाला होतोय एकाचा मृत्यू

मुंबईत पोलिस दलात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा धोका वाढत आहे. गुरुवारी 9 नवीन पोलीस कोरोना (coronavirus) पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संख्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत. मुंबई पोलिस दलात आतापर्यंत जवळपास 600 च्या आसपास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

First published: May 15, 2020, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading