मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /हर्बल उत्पादनांच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस

हर्बल उत्पादनांच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस

Online Fraud in Mumbai: कोविड साथीच्या काळात हर्बल उत्पादनाची ऑनलाइन विक्री करण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Online Fraud in Mumbai: कोविड साथीच्या काळात हर्बल उत्पादनाची ऑनलाइन विक्री करण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Online Fraud in Mumbai: कोविड साथीच्या काळात हर्बल उत्पादनाची ऑनलाइन विक्री करण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

मुंबई, 01 जून: कोविड साथीच्या काळात ऑनलाइन साहित्य विक्रीच्या (Online Fraud) नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच एका ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळीला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी हर्बल उत्पादनाच्या नावाखाली लोकांना अनेक लाखांना लुटत होती. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. मोहम्मद हुसैन तुकाराम शेख उर्फ शिवाजी तुकाराम बेनुगडे (वय-51), डॉ. त्रिजुगीलाल बुधराम कुर्मी (वय- 43) सलीम अनवरुद्दीन शेख (वय-39) अशी अटक आरोपींची नावं आहेत. या टोळीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील समोर आलं आहे.

या टोळीतील व्यंकेटेश नाडर, लालजी, आरिफ शेख यांच्यासह जेरी, संडे आणि एडवर्ड या नायजेरियन नागरिकांचा देखील शोध घेतला जात आहेत. काही दिवसांपूर्वी हरियाणातील कॅबिनेट मंत्र्यांचे भाचे नफिस अहमद मोहम्मद युनूस खान यांनी त्यांच्या घोड्याच्या उपचारासाठी एकेआय रिझवर्ड पावडर ऑनलाइन मागवली होती. खान यांनी ही पावडर अजयकुमार हर्बल इंटरप्रायजेसचे अर्चनकुमार आणि एम एच इंटरप्रायजेसचे मोहम्मद हुसैन तुकाराम शेख यांच्याकडून मागवली होती. मात्र या व्यवहारात त्यांची 1 लाख 69 हजारांची या टोळीने आर्थिक फसवणूक केली आहे.

फसवणूक केल्यानंतर आरोपींनी त्यांचे सर्व मोबाइल नंबर बंद केले होते. याप्रकरणी शेख यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तपास करत असताना  चेंबूर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने विविध लोकांकडून हर्बल पावडर, कच्चे वैद्यकीय साहित्य ऑनलाइन विक्रीच्या नावाखाली अनेकांना फसवलं आहे. हे फसवणूक केलेले पैसे बॅंकेत जमा करून घेण्यासाठी आरोपींनी विविध बनावट करारनामे तयार करून 16 बँकांमध्ये आपली खाती उघडली होती.

हे वाचा-Cyber Crime : पत्नी गेली माहेरी, पतीनं फेक अकाऊंट बनवत केलं घाणेरडं कृत्य

आरोपींची 16 बँकेची खाती तपासली असता, त्यामध्ये जवळपास पाच कोटी रुपये आढळले आहेत. ही सर्व रक्कम आरोपींनी लोकांना गंडा घालून कमावल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी  महाराष्ट्रसह दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, केरळ अशा विविध राज्यातील लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी या टोळीतील तीन जणांना बेड्या ठोकल्या असून अद्याप सहा जणांचा शोध घेतला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai, Online fraud