मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी अभिनेत्री आज रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश करणार

अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी अभिनेत्री आज रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश करणार

पायलकडे महिला मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते अशी चर्चा आहे.

पायलकडे महिला मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते अशी चर्चा आहे.

पायलकडे महिला मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते अशी चर्चा आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 26 ऑक्टोबर : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर #Me Too चा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष आता राजकारणात एन्ट्री करत आहे. अभिनेत्री पायल घोष आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. अभिनेत्री पायल घोष RPI चा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी समन्स बजावत कश्यप यांची 8 तास चौकशीदेखील केली होती. या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. तर कश्यप यांना एक्स वाईफनं पाठिंबा दिला होता. हे वाचा-मुंडे-धस संघर्ष निर्माण झालेला असतानाच प्रकाश आंबेडकरही उतरले मैदानात पायल घोषकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुराग कश्यप यांच्यावर आरोप लावल्यानंतर पायल घोषला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता पायल RPI पक्षात प्रवेश करणार आहे. पायलसोबत तिचे वकील देखील RPI जॉईऩ करणार आहेत. पायलकडे महिला मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते अशी चर्चा आहे.
First published:

Tags: Ramdas athawale

पुढील बातम्या