मुंडे-धस संघर्ष निर्माण झालेला असतानाच प्रकाश आंबेडकरांनीही घेतली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नात उडी

मुंडे-धस संघर्ष निर्माण झालेला असतानाच प्रकाश आंबेडकरांनीही घेतली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नात उडी

ऊसतोड मजूर कामगार मुकादम मेळाव्याला संबोधित करताना प्रकाश आंबेडकरांनी ही घोषणा केली.

  • Share this:

बीड, 26 ऑक्टोबर : नवा करारनामा होईपर्यंत एकही ऊसतोड कामगार गाडीत बसणार नाही, अशी घोषणा वंचित बहुनज आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ऊसतोड मजूर मेळाव्यात केली आहे. भगवान गडाच्या पायथ्याशी खरवंडी कासार गावामध्ये आयोजित ऊसतोड मजूर कामगार मुकादम मेळाव्याला संबोधित करताना प्रकाश आंबेडकरांनी ही घोषणा केली.

'ऊसतोड मजुरांची खरी गरज कारखानदाराला आहे. तिथल्या आमदार,खासदार, शुगर लॉबीला गरज आहे. थोडा दम काढला तर बोर्ड आणि मशीनची मजुरी मिळेल. त्यामुळे या लढ्याला मदत करताना एकही ऊसतोड मजूर कारखान्यावर जाणार नाही,' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कारखाना सुरू करणे सरकार आणि साखर कारखनदार यांची गरज आहे. आज जसा तग धरलेला आहे, सगळ्या ऊसतोड मजूर यांनी असंच घट्ट बसून राहा. नवा करारनामा करा, तर आम्ही येतो. माथाडी कामगारांसारखा लढा द्या. माथाडी कामगारांसारखा ऊसतोड कामगार बोर्ड तयार झाला तर सर्व प्रश्न सुटतील, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

दरम्यान, ऊसतोड कामगारांच्या आंदोलनावरून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात मतभेद निर्माण झालेले असतानाच प्रकाश आबेडकर यांनीही या प्रश्नात उडी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 26, 2020, 12:15 AM IST

ताज्या बातम्या