मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पाच तास खलबतं, नेमक्या वाटाघाटी काय झाल्या?

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात पाच तास खलबतं, नेमक्या वाटाघाटी काय झाल्या?

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मंत्रालयात आज जवळपास पाच तास संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते अजय गुजर आणि त्यांचे शिष्टमंडळ यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब यांची महत्वाची बैठक पार पडली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मंत्रालयात आज जवळपास पाच तास संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते अजय गुजर आणि त्यांचे शिष्टमंडळ यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब यांची महत्वाची बैठक पार पडली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मंत्रालयात आज जवळपास पाच तास संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते अजय गुजर आणि त्यांचे शिष्टमंडळ यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब यांची महत्वाची बैठक पार पडली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 20 डिसेंबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलानच्या (ST Employees Strike) पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) कर्मचाऱ्यांच्या मागणी संदर्भात जी समिती गठीत केलीय त्या समितीला विलीनीकरणाच्या मुद्दे आणि इतर मागणींबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांचा वेळ दिला आहे. पण जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत एसटी कर्मचारी संप मागे घेण्याच्या तयारीत नाहीत. या दरम्यान आज मंत्रालयात (Mantralaya) जवळपास पाच तास संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते अजय गुजर (Ajay Gujar) आणि त्यांचे शिष्टमंडळ यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची महत्वाची बैठक पार पडली. संबंधित बैठक पार पडल्यानंतर अनिल परब आणि अजय गुजर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

अनिल परब नेमकं काय म्हणाले?

एसटी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर 2021 रोजी संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप सुरु झाला होता. ज्या एसटी कर्मचारी संघटनेच्या नोटीसवरुन हा संप सुरु झाला होता तो संप गेल्या 54 दिवसांपासून सुरु आहे. या विविध पातळीवर आणि माध्यामांमधून आम्ही संपकरी कर्मचाऱ्यांसोबत बोलत होतो. हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. संप करु नका, असा कोर्टाचा आदेश होता. त्यावर आम्ही कटेम्ट फाईल केला होता.

हेही वाचा : मुहूर्त ठरला, शिवसेना यूपीएत सहभागी होणार; सोनिया गांधींच्या उपस्थित प्रवेश सोहळा

या दरम्यानच्या काळात कोर्टाने जी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी होती त्या मागण्यांसाठी आमची भूमिका सतत मांडत होतो. हायकोर्टाने एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्दायवर ही समिती 12 आठवड्यांच्या आता आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना देईल. तो अहवाल मुख्यमंत्र्यांच्या परवानगी हायकोर्टात सादर केला जाईल. एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत संप होऊ देऊ नका, असं आवाहन आम्ही केलं होतं. विलीनीकरणाच्या मागणी व्यतिरिक्त इतर मागण्यांसाठी आमची चर्चेची दारं खुली आहेत, असा विचार आम्ही ठेवला होता. या दरम्यानच्या काळात राज्य सरकारकडून पगारवाढ जाहीर करण्यात आली.

अनिल परबांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे :

आमच्याकडून वारंवार चर्चेचं आवाहन करण्यात येत होतं. आमच्या चर्चेला प्रतिसाद देत एसटी कर्मचारी संघटनेचे अजयकुमार गुजर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती आम्ही काही गोष्टी मान्य केल्या आहेत.

विलीनीकरणाचा मुद्दा त्रिसदस्यीय समितीसमोर आहे. त्या समितीचा जो निर्णय असेल तो आम्हाला आणि कर्मचाऱ्यांना मान्य असेल.

आर्थिक मागण्यांबाबत शासकीय कर्मचाऱ्यांसारखं वेतन मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. आम्ही मूळ पगारात वाढ केली आहे. पण त्या विषयावर आम्ही चर्चेस तयार असल्याचं मान्य केलं आहे.

कामगार कामावर रुजू झाले आणि डेपो सुरु झाले तर निलंबन किंवा बडतर्फ करण्याची कारवाई मागे घेऊ. फक्त ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची संबंधित प्रकिया पूर्ण करुन कारवाई मागे घेऊ.

हेही वाचा : 'आधी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येऊ द्या, लोकांना होणारा त्रास कमी करा', कोर्टाने सदावर्तेंना फटकारलं

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, संपकरी अजय गुजर यांची घोषणा

दुसरीकडे या पत्रकार परिषदेत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिविधी अजय गुजर यांनी संपातून माघार घेतली आहे. "एसटी संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. विलीनीकरणा संदर्भात न्यायालय जो निर्णय देईल तो सरकार आणि कर्मचारी आम्हा दोघाना मान्य असेल. आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये आर्थिक मदत  मिळावी आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळावी. करोना काळात 306 कर्मचारी मृत्यू पावले. त्यांना शासन निर्णयाप्रमाणे 50 लाख रुपये देण्यात यावे. आतापर्यंत 10 जणांना ही मदत देण्यात आलीय. उर्वरीत कामगारांच्या कुुटुंबांना लवकरच नीधी देण्यात येणार आहे. संपकरी ST कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी विलीनीकरणा संदर्भात आहे. न्यायालयाने आमच्या विरोधात जरी निर्णय दिला तरी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ. ST कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबरपासून रात्री 12 वाजेपासून कामावर रुजू व्हावे. ST संपाची नोटीस आम्ही दिली होती. त्यामुळे आमची संघटना संप मागे घेत आहे", अशी घोषणा अजय गुजर यांनी केली.

First published: